उन्हाळा आला की अनेकदा कोरड्या- गरम हवेमुळे त्वचा चिकट आणि तेलकट होते. उन्हाळ्यात चेहऱ्यावर घाम आणि धूळही जमा होते. ज्यामुळे त्वचा निर्जीव होते आणि कोमेजून जाते. बदलणाऱ्या हवेत त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी फेस पॅक बनवता येतात. या घरगुती फेस पॅकमुळे चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी होतं, मृत त्वचेच्या पेशी देखील काढून टाकल्यानं त्वचेला ताजेपणा जाणवतो. यामुळे चिकटपणा दूर होतो आणि चेहऱ्यावर चमक येते.
advertisement
उन्हाळ्यासाठी फेस पॅक
बदामाचा फेस पॅक - बदामापासून त्वचेला व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात मिळतं. या फेसपॅकमुळे त्वचेला हायड्रेशन म्हणजे आवश्यक आर्द्रता मिळते. फेस पॅक बनवण्यासाठी 4 ते 5 बदाम 2-3 चमचे दुधात टाका आणि रात्रभर भिजत ठेवा. बदाम 4-5 तास भिजवून ठेवता येतात. बदाम भिजले की, बारीक करून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक 20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा.
Scrub : चेहऱ्यावरचा कोरडेपणा घालवण्यासाठी खास स्क्रब, घरच्या वस्तूंचा होईल उपयोग
दही आणि बेसनाचा फेस पॅक - हा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा दह्यात 2 चमचे बेसन आणि थोडी हळद मिसळा. आवश्यकतेनुसार थोडं दही घाला. हा फेस पॅक चेहऱ्यावर 20 ते 25 मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे त्वचेचा पोत सुधारेल.
काकडी आणि कोरफड - त्वचेला ताजेपणा देण्यासाठी काकडी आणि कोरफडीचा फेस पॅक लावता येतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी काकडीचा रस आणि दोन चमचे कोरफड जेलमध्ये मिसळा. यासाठी किसलेली काकडीही वापरु शकता. ही पेस्ट नीट मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनी धुवा.
Suryanamaskar : प्रकृती ठणठणीत ठेवण्यासाठी सोपा उपाय, सूर्यनमस्कार घाला, आजारांना दूर ठेवा
मुलतानी माती फेस पॅक - त्वचेवरचा तेलकटपणा कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा फेस पॅक लावता येतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये आवश्यकतेनुसार मध मिसळून पेस्ट बनवा. हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर धुवून टाका. चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी दूर होतील, त्वचेची जळजळ कमी होईल आणि त्वचा उजळ दिसेल.
कॉफी फेस पॅक - या फेसपॅकमुळे चेहऱ्याची त्वचा खोलवर स्वच्छ केली जाते. फेस पॅक बनवण्यासाठी कॉफी पावडरमध्ये दही मिसळा आणि थोडी हळद घालून फेस पॅक तयार करा. हा फेस पॅक 20 ते 25 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर धुवा. चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा फेसपॅक लावू शकता.
हळद फेस पॅक - उन्हामुळे होणारं टॅनिंग कमी करण्यासाठी हा फेसपॅक प्रभावी आहे. दही किंवा दुधात हळद घालून कापसाच्या मदतीनं चेहऱ्यावर लावा. हा पॅक 15-20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा.
ओट्स फेस पॅक - हा एक्सफोलिएटिंग फेस पॅक बनवण्यासाठी 2 चमचे ओट्स बारीक करून त्यात 2 चमचे दूध आणि एक चमचा मध मिसळून पेस्ट बनवा. तयार केलेला फेस पॅक 20 ते 25 मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा. आठवड्यातून एकदा हा फेस पॅक वापरा.