Suryanamaskar : प्रकृती ठणठणीत ठेवण्यासाठी सोपा उपाय, सूर्यनमस्कार घाला, आजारांना दूर ठेवा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
रोज सूर्यनमस्कार केल्यानं शरीर लवचिक राहतं, स्नायू बळकट राहतात. सूर्यनमस्कार हा 12 आसनांचा एक संच आहे. पूर्ण प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सूर्यनमस्कार हा उत्तम पर्याय आहे.
मुंबई : रोजच्या धावपळीत स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिम, चालणं, योगासनं हे पर्याय आहेतच. याच योगासनांमधल्या सूर्यनमस्काराचे खूप फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सूर्यनमस्कार तुम्ही घरी करु शकता, त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. यासाठी कोणत्याही मशिनची गरज नाही. तुम्ही घरीच सूर्यनमस्कार करुन लवचिकता वाढवू शकता.
तुम्ही दिवसातून पाचवेळा सूर्यनमस्कार केले तर तुमच्या शरीरासाठी हे खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे स्वत:ला सकारात्मक आणि सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही दिवसाची सुरुवात निरोगी पद्धतीनं करु शकता. रोज सूर्यनमस्कार केल्यानं शरीर लवचिक राहतं, स्नायू बळकट राहतात. सूर्यनमस्कार हा 12 आसनांचा एक संच आहे. पूर्ण प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सूर्यनमस्कार हा उत्तम पर्याय आहे.
advertisement
पाच वेळा सूर्यनमस्कार करण्याचे फायदे -
- दररोज सूर्यनमस्कार केल्यानं शरीरात लवचिकता येते. स्नायूंसाठी हा चांगला व्यायाम आहे.
- सूर्यनमस्कारांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं.
- सूर्यनमस्कारांमुळे चयापचयाचा वेग वाढतो आणि वजन कमी होतं.
advertisement
- कॅलरीज वेगानं बर्न होतात. हा व्यायाम तुमच्या पाय, हात, पाठ आणि पोटाच्या स्नायूंना टोन करण्यासाठी उपयुक्त आहे.
- ही आसनं केल्यानं पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पचनक्रियाही सुधारते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
- सूर्यनमस्कार केल्यानं मानसिक शांती मिळते. यामुळे तणाव आणि चिंता दूर करण्यात मदत होते. यामुळे एकाग्रता वाढते.
advertisement
- सूर्यनमस्कारांमुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
- सूर्यनमस्कारांमुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि ताजंतवानंही वाटतं. या व्यायामामुळे शरीर दिवसभर ऊर्जावान राहतं.
-सूर्यनमस्कारांमुळे एकाग्रता वाढते आणि आत्मिक शांती मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 17, 2025 6:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Suryanamaskar : प्रकृती ठणठणीत ठेवण्यासाठी सोपा उपाय, सूर्यनमस्कार घाला, आजारांना दूर ठेवा