बोकारो : आजकाल अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात सकाळी उपाशी पोटी पाणी पिऊन करतात. यामध्ये काही लोक सकाळी उठल्यावर थंड पाणी पिणे पसंत करतात तर काही जण गरम पाणी पिणे पसंत करतात. मात्र, याबाबत आजही अनेकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम आहेत. म्हणून याचबाबत आपण योग्य माहिती जाणून घेऊयात.
बोकारो येथील ज्येष्ठ आयुर्वेदिक डॉ. राजेश पाठक यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. राजेश पाठक यांनी राष्ट्रीय आरोग्य विज्ञान आणि संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून एम.डी. चे शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांना पतंजलि आयुर्वेद येथील 16 वर्षांचा अनुभव आहे. तसेच सध्या ते शुध्दी आयुर्वेदात मागील 3 वर्षांपासून कार्यरत आहेत.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पाणी आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे. कारण ते आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवते. तसेच अनेक आजारांपासून बचाव आणि उपचारातही महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे प्रत्येकाला नियमित 2 ते 3 लीटर पाणी प्यायला हवे.
गरम पाणी पिण्याचे फायदे काय -
आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार, सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. गरम पाणी पचनक्रियेला सक्रिय करते. आतड्यांमधील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. गरम पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया वाढते, त्यामुळे शरीरात साठलेली चरबी लवकर जळते.
वजन कमी करण्यासाठीही हे फायदेशीर आहे. गरम पाणी प्यायल्याने यकृत आणि मूत्रपिंडांना डिटॉक्स करण्यास मदत होते. यामुळे शरीरातील हानिकारक घटक काढून टाकले जातात. यासोबतच गरम पाणी हे शरीराला आतून उबदार ठेवते. त्यामुळे सर्दी-खोकला यांसारख्या मौसमी आजारांपासून बचाव होतो.
हरतालिकेच्या पूजेमध्ये या गोष्टींचा समावेश करायला विसरू नका, अन्यथा मिळणार नाही उपवासाचं फळ
थंड पाणी पिण्याचे नुकसान -
तज्ञ जनक कुमार यांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी थंड पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पचनक्रिया मंदावते. तसेच अपचन, गॅस आणि ॲसिडिटी सारख्या समस्याही तुम्हाला उद्भवू शकतात. यासोबतच थंड पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्याही आकुंचन पावतात, यामुळे रक्तपुरवठा मंदावतो. परिणामी शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे वेळेवर मिळत नाहीत. थंड पाण्यामुळे शरीराचे तापमान कमी होते. यामुळे शरीराला सामान्य तापमानात आणण्यासाठी अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. परिणामी थकवाही जाणवू शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.
56 आजार दूर करण्याचे रहस्य -
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने वात, पित्त आणि कफ हे तीन दोष शरीरात संतुलित राहतात, असे आयुर्वेदात असे मानले जाते. तसेच हे संतुलन शरीराला 56 प्रकारच्या आजारांपासून वाचवण्यास मदत करते. यामध्ये पचनाच्या समस्या, लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, सर्दी आणि त्वचारोग आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सूचना : या बातमीत दिलेली माहिती तसेच आरोग्यविषयक सल्ला हा तज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. व्यक्तीगत सल्ला नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा वापर करावा. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
