बडीशेपेमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा खजिना आहे. तर खडी साखर थकवा दूर करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी उपयुक्त मानली जाते. त्यामुळे बडीशेप आणि साखरेचं पाणी तुम्ही रिकाम्या पोटी प्यायलं तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. जाणून घेऊया त्याचे फायदे..
बेबी पावडरमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय Cancer, पावडर लावताना कोणती काळजी घ्यावी?
advertisement
एक चमचा बडीशेप आणि खडी साखरेचा एक छोटा तुकडा एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पाणी कोमट करून रोज रिकाम्या पोटी पिऊ शकता.
बडीशेप आणि खडी साखरेचं पाणी का आहे परिणामकारक -
शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त : बडीशेप आणि खडी साखरेमध्ये डिटॉक्सिंग गुणधर्म आढळतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करतात. या पाण्याच्या नियमित सेवनानं यकृताचं कार्य सुधारतं.
मीठामुळे दरवर्षी 18 लाख लोकांचा मृत्यू? WHO च्या नव्या अहवालाने वाढवली चिंता
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त - वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी बडीशेप आणि खडी साखरेचं पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं. हे मिश्रण कमकुवत झालेली चयापचय क्रिया सुधारण्यात मदत करते.
मौखिक आरोग्यासाठी फायदेशीर : बडीशेप त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. यामुळे संसर्ग, दुर्गंधी आणि हिरड्यांचे आजार टाळण्यास मदत होते. यामुळे तोंड स्वच्छ होतं आणि जीवाणू वाढीला आळा बसतो.
सांधेदुखीपासून आराम मिळतो: या मिश्रणातील दाहक-विरोधी गुणधर्म, संधिवात आणि स्नायू दुखण्याची लक्षणं कमी करण्यास मदत करतात. या पाण्याच्या नियमित सेवनानं सांधेदुखी कमी होते.
पचनास मदत करते: बडीशेप खाल्ल्यानं पचनक्रिया सुधारते तसंत बडीशेप आणि खडी साखरेचं पाणी प्यायल्यानं अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या आटोक्यात राहते, ज्यामुळे आतडी निरोगी होतात.
