बेबी पावडरमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय Cancer, पावडर लावताना कोणती काळजी घ्यावी?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
टीव्हीवर आपल्याला खूप जाहिराती दिसतात, त्या बघून बेबी प्रॉडक्ट घेतली जातात. मात्र बेबी पावडरमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो.
लहान बाळांसाठी सर्वांत चांगली उत्पादने वापरावी, याकडे पालकांचा कल असतो. लहान मुलांची सुरक्षा आणि वस्तूची क्वालिटी ही दोन त्यामागील महत्त्वाची कारणं असतात. त्यामुळे बाजारपेठेत गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीची उत्पादने घेण्यास प्राधान्य दिले जाते. लहान मुलांना पावडर, काजळ, तेल लावतात. टीव्हीवर आपल्याला खूप जाहिराती दिसतात, त्या बघून बेबी प्रॉडक्ट घेतली जातात. मात्र बेबी पावडरमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो.
advertisement
2021 मध्ये अमेरिकेतून एक प्रकरण उघडकीस आलं होतं, ज्यात एका व्यक्तीला बेबी पावडरचा वास घेतल्याने कॅन्सर झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याने या संदर्भात याचिका केली होती. कोर्टाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निर्णय देत लोकप्रिय बेबी पावडर कंपनीला एक अब्ज रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे बेबी पावडरमुळे खरंच कॅन्सर होतो का, असा प्रश्न उपस्थित झाला. या निकालानंतर लहान मुलांच्या पालकांमध्ये घबराट पसरली होती. तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याला बेबी पावडर लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घ्या.
advertisement
बेबी पावडरमुळे कॅन्सर कसा होतो?
बेबी पावडरमध्ये एक ॲस्बेस्टॉस नावाचा घटक आढळतो, यातून शरीरात कॅन्सरचे जंतू वाढू लागतात. पीडितेने या पावडरचा वास घेतला होता, त्यामुळे कॅन्सर झाला. लहान मुलांना बेबी पावडर लावल्याने फुफ्फुसांशी संबंधित समस्या होऊ शकतात.
advertisement
बेबी पावडर लावताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी
- लहान मुलांजवळ कधीही बेबी पावडरचा डबा ठेवू नका.
- बेबी पावडर थेट लहान मुलांच्या शरीरावर टाकू नका, ती थोडी तळहातावर घ्या आणि नंतर मुलांच्या त्वचेवर लावा.
- ज्या अवयांमधून बेबी पावडर शरीराच्या आत जाऊ शकते, तिथे ती कधीच लावू नका.
- डोळे, तोंड आणि नाकाभोवती बेबी पावडर लावू नका.
- जर तुम्ही मुलांना डायपर रॅशेससाठी पावडर लावत असाल तर कमीतकमी लावा.
- मुलाच्या कोणत्याही कपड्यावर पावडर लागल्यास ते स्वच्छ धुवा.
- पावडर लावताना पंखा किंवा कूलर बंद करा, नाहीतर पावडर मुलांच्या डोळ्यात किंवा नाकात जाऊ शकते.
- डॉक्टरांचा सल्ला घेऊनच लहान मुलांना पावडर लावा.
- जर तुमच्या मुलांची त्वचा नाजूक असेल तर पावडर लावणं टाळा.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2024 10:07 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बेबी पावडरमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय Cancer, पावडर लावताना कोणती काळजी घ्यावी?