नाश्ता वगळला तर त्याचा मेंदूवरही परिणाम होतो. डॉ. संदीप मावानी हे न्यूरोसर्जन आहेत. नाश्ता न करण्यानं, शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
Constipation : बद्धकोष्ठतेवर हे उपाय नक्की करा, तुम्हाला वाटेल फ्रेश
नाश्ता वगळला तर मेंदूवर होणारे परिणाम
- ऊर्जेची कमी पातळी
मेंदू उर्जेसाठी ग्लुकोजवर अवलंबून असतो. नाश्ता केला नाही तर रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ लागते, थकवा जाणवतो आणि कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो.
advertisement
- स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर परिणाम
नाश्ता केला नाही, तर सकाळच्या इंधनाशिवाय, स्मरणशक्ती आणि शिकण्यास मदत करणारे एसिटाइलकोलीनसारखे न्यूरोट्रांसमीटर कमी सक्रिय राहतात. याचा एकाग्रतेच्या शक्तीवर देखील परिणाम होतो.
- मूड स्विंग्स आणि चिडचिड
नाश्ता अचानक सोडला तर कॉर्टिसोलसारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. यामुळे चिंता, चिडचिड वाढते आणि नैराश्य जाणवतं.
Walnuts : अक्रोडाचे गुणकारी फायदे, मेंदूच्या आरोग्याबरोबरच वजन नियंत्रणासाठीही उपयुक्त
- निर्णय क्षमता आणि प्रतिसाद देण्यावर परिणाम
कमी ऊर्जेमुळे, मेंदूतील न्यूरॉन्स चांगल्या प्रकारे संवाद साधू शकत नाहीत. याचा निर्णय घेण्याच्या किंवा प्रतिसाद देण्याच्या गतीवर परिणाम होतो.
- भूक आणि अति खाणेचं गणित
नाश्ता केला नाही तर ते मेंदूला भूकेचे तीव्र संकेत जातात. यामुळे नंतर जास्त भूक लागते आणि साखरेचे आणि चरबीयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा सुरू होते. बऱ्याचदा नाश्ता वगळणारी व्यक्ती पुढच्या जेवणात गरजेपेक्षा जास्त जेवते.
संतुलित नाश्ता खाणं शरीरासाठी महत्त्वाचं आहे. मेंदूला तीक्ष्ण आणि लक्ष केंद्रित राहण्यासाठी आवश्यक असलेलं इंधन पुरवण्यासाठी डॉक्टर प्रथिनं, फायबर आणि निरोगी चरबीयुक्त संतुलित जेवण खाण्याची शिफारस करतात.