Walnuts : अक्रोडाचे गुणकारी फायदे, मेंदूच्या आरोग्याबरोबरच वजन नियंत्रणासाठीही उपयुक्त
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
अक्रोड मेंदूच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे हे माहित असतं पण त्याव्यतिरिक्त हाडं, हृदय, मधुमेह नियंत्रण, त्वचा या सगळ्यासाठीही अक्रोड उपयुक्त आहे.अक्रोडाला पौष्टिकतेचा खजिना म्हटलं जातं. त्यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी२, ओमेगा-३ फॅटी एसिड, हेल्दी फॅट, प्रथिनं, फायबर असे गुणधर्म असतात. शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यासाठी हे घटक मदत करतात.
मुंबई : आपल्या आहारात जेवणाव्यतिरिक्त महत्त्वाची आहेत फळं, सुकी फळं. सुकी फळं म्हणजेच ड्रायफ्रूटस..यातलच एक सुकं फळ म्हणजे अक्रोड. दररोज भिजवलेले दोन अक्रोड खाल्ले तर शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
अक्रोड मेंदूच्या स्वास्थ्यासाठी फायदेशीर आहे हे माहित असतं पण त्याव्यतिरिक्त हाडं, हृदय, मधुमेह नियंत्रण, त्वचा या सगळ्यासाठीही अक्रोड उपयुक्त आहे. अक्रोडाला पौष्टिकतेचा खजिना म्हटलं जातं. त्यात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी२, ओमेगा-३ फॅटी एसिड, हेल्दी फॅट, प्रथिनं, फायबर असे गुणधर्म असतात. शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यासाठी हे घटक मदत करतात.
advertisement
भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे
1. मेंदूचं आरोग्य-
भिजवलेले अक्रोडातले ओमेगा-३ फॅटी एसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी मदत करतात.
2. पचन-
पचनाच्या समस्या असतील तर दररोज भिजवलेले दोन अक्रोड खाऊ शकता. कारण त्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं.
advertisement
3. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
भिजवलेल्या अक्रोडात भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिनं असतात, ज्यामुळे पोट बराच काळ भरलेलं राहण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
4. त्वचा-
भिजवलेल्या अक्रोडात असलेलं व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करू शकतात.
advertisement
5. हाडं-
अक्रोडात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे पोषक घटक असतात, हाडं मजबूत करण्यासाठी याची मदत होते. कमकुवत हाडं मजबूत करण्यासाठी, भिजवलेले दोन अक्रोड खाऊ शकता.
6. मधुमेह-
मधुमेहाच्या रुग्णांसाठी भिजवलेले अक्रोड खाणं फायदेशीर आहे. दररोज भिजवलेले दोन अक्रोड खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
7. हृदय-
हृदय हे आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. भिजवलेले अक्रोड खाण्याचे हृदय निरोगी ठेवण्यासाठीही उपयुक्त आहेत.
advertisement
पौष्टिक असले तरी अक्रोड जास्त खाऊ नये कारण यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. वजन वाढण्याचीही शक्यता असते. काहींना सुकी फळं खाण्याची एलर्जी असते, जास्त अक्रोड खाल्ल्यानं अंगावर पुरळ उठू शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 17, 2025 6:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Walnuts : अक्रोडाचे गुणकारी फायदे, मेंदूच्या आरोग्याबरोबरच वजन नियंत्रणासाठीही उपयुक्त