Black Berry : आरोग्यासाठी गुणकारी फळ - जांभूळ, त्वचा - हृदयरोगासाठी उपयुक्त
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
जांभूळ पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांमुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे. मधुमेह, पचन, हृदय, रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे जांभूळ नक्की खा.
मुंबई : ऋतूप्रमाणे येणारी फळं खावीत असा सल्ला डॉक्टर कायम देतात. त्यातलंच एक फळ म्हणजे जांभूळ. जांभूळ हे औषधी गुणधर्म असलेलं पौष्टिक फळ. याची गोड-आंबट चव तर आवडतेच पण याचे प्रकृतीसाठीही अनेक फायदे आहेत.
जांभूळ मधुमेह, पचन व्यवस्था, हृदयरोग आणि त्वचेची चमक सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. त्यात असलेलं व्हिटॅमिन सी, लोह, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
1. मधुमेह नियंत्रण
जांभळात जाम्बोलिन आणि जाम्बुसिन नावाचे घटक असतात, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत होते. इन्सुलिनची क्रिया वाढवून ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतं.
advertisement
2. पचनशक्तीसाठी उपयुक्त
जांभळात असलेले फायबर आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पचनसंस्थेला सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. बद्धकोष्ठता, आम्लता आणि अपचन यासारख्या समस्या दूर करण्यासाठी जांभूळ खूप उपयुक्त आहे.
3. हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त
जांभळात पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल कमी करून हृदय निरोगी ठेवते आणि यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
advertisement
4. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
जांभळात असलेले व्हिटॅमिन सी, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. विषाणूजन्य संसर्ग आणि सर्दी आणि खोकल्यापासून संरक्षण करण्यासाठी जांभूळ प्रभावी आहे.
5. त्वचा उजळवण्यासाठी उपयुक्त
जांभळातले अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेची चमक वाढवण्यासाठी आणि मुरुम कमी करण्यासाठी मदत करतात. जांभूळ खाल्ल्यानं त्वचा निरोगी आणि तरुण दिसते.
advertisement
जांभूळ पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांमुळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर फळ आहे. मधुमेह, पचन, हृदय, रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे जांभूळ नक्की खा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 17, 2025 5:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Black Berry : आरोग्यासाठी गुणकारी फळ - जांभूळ, त्वचा - हृदयरोगासाठी उपयुक्त