LDL : दैनंदिन आहारात करा या पाच पदार्थांचा समावेश, कोलेस्ट्रॉल राहिल नियंत्रणात
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
ज्याप्रमाणे चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं, त्याचप्रमाणे काही खास आणि आरोग्यदायी गोष्टींचं सेवनानं कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. मेथी दाणे, लसूण, नारळ, भेंडी, सफरचंद या पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं.
मुंबई : खाण्याच्या वाईट सवयींमुळे बॅड कोलेस्ट्रॉल (LDL कोलेस्ट्रॉल) वाढण्याची समस्या खूप वाढते आहे. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमधे जमा होऊ शकतं आणि त्यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
ज्याप्रमाणे चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढतं, त्याचप्रमाणे काही खास आणि आरोग्यदायी पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, रक्तवहिन्यासंबंधी सर्जन आणि व्हेरिकोज व्हेन्सचे तज्ज्ञ डॉ. सुमित कपाडिया यांनी खास पाच पदार्थ सुचवले आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
मेथीचे दाणे
डॉ. कपाडिया यांच्या सल्ल्यानुसार, मेथीच्या दाण्यांत चांगल्या प्रमाणात विरघळणारं फायबर असतं, आतड्यांमधे कोलेस्ट्रॉल थांबवून शरीरात शोषण रोखण्याचं काम यामुळे होऊ शकतं. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणं उपयुक्त आहे.
नारळ
नारळ मर्यादित प्रमाणात खाल्ल्यानं एचडीएल म्हणजेच चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते, ज्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण देखील कमी होतं.
advertisement
भेंडी
भेंडी खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे. यापैकी एक फायदा म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं. भेंडीत म्युसिलेज नावाचं चिकट फायबर असतं, यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल बाहेर टाकण्यासाठी मदत होते.
सफरचंद किंवा पेरू/आवळा
सफरचंदात असलेलं पेक्टिन आणि अँटीऑक्सिडंट्स यकृत मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहेत तसंच यामुळे एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. सफरचंदाबरोबरच पेरू किंवा आवळा हे पर्यायही तितकेच प्रभावी आहेत.
advertisement
लसूण
लसणामुळे केवळ कोलेस्ट्रॉल कमी होत नाही तर रक्तदाब देखील नियंत्रित होतो. डॉ. कपाडिया यांच्या मते, दररोज कच्च्या लसणाच्या 1-2 पाकळ्या चावून खाल्ल्यानं हृदयाचं आरोग्य दीर्घकाळ निरोगी ठेवता येतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 16, 2025 6:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
LDL : दैनंदिन आहारात करा या पाच पदार्थांचा समावेश, कोलेस्ट्रॉल राहिल नियंत्रणात