Hair Growth : केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय, तुमच्या घरातच आहे उत्तर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केस गळणं, केस पांढरे होणं, केसांत कोंडा होणं अशा अनेक समस्या असतात. यासाठी विविध उपाय आहेतही. तसंच निसर्गोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं देखील तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज दास यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भातला खास घरगुती उपाय शेअर केला आहे. त्यांच्या मते, तांदळाच्या पाण्यात स्वयंपाकघरातील काही घटक मिसळून स्प्रे तयार केला तर ते केसांची वाढ चार पट वेगानं होण्यास मदत होते.
मुंबई : केस गळती रोखण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे केवळ केसांच्या समस्यांनी त्रस्त असलेल्यांनाच माहित असतं. अशी समस्या तुम्हालाही जाणवत असेल तर ही माहिती नक्की वाचा. विचार न करता डोक्यावर काहीही लावल्यानं कोणताही विशेष परिणाम दिसून येत नाही. उलट त्रास वाढतो.
केस गळणं, केस पांढरे होणं, केसांत कोंडा होणं अशा अनेक समस्या असतात. यासाठी विविध उपाय आहेतही. तसंच निसर्गोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं देखील तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज दास यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भातला खास घरगुती उपाय शेअर केला आहे.
त्यांच्या मते, तांदळाच्या पाण्यात स्वयंपाकघरातील काही घटक मिसळून स्प्रे तयार केला तर ते केसांची वाढ चार पट वेगानं होण्यास मदत होते.
advertisement
केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय
डॉ. मनोज दास यांच्या मते, तांदळाचं पाणी केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यापासून बनवलेल्या रेसिपीमुळे केस चार पट वेगानं वाढू शकतात. यासाठी शंभर ग्रॅम तांदूळ अर्धा लीटर पाण्यात भिजवावे लागतील.
तांदूळ सुमारे तीन तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी दहा ते पंधरा मिनिटं गरम करण्यासाठी ठेवा. आच मंद ठेवा, जेणेकरून तांदळाचे गुणधर्म पाण्यात जातील.
advertisement
यानंतर, तांदूळ गाळून घ्या आणि तयार तांदळाचं पाणी बाजूला ठेवा. या तांदळाच्या पाण्यात ग्लिसरीन आणि कडुनिंबाचा रस घाला आणि चांगलं मिसळा. हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरून ठेवा. ते दररोज रात्री केसांना लावा. हा हेअर ग्रोथ स्प्रे केसांवर शिंपडा आणि टाळूवर चांगला घासून घ्या. दुसऱ्या दिवशी केस सौम्य शाम्पूनं धुवा. दररोज रात्री केसांना हा स्प्रे लावला तर केस रोज धुवावे लागतील असं नाही. तुम्ही आठवड्यातून दोनदा केस धुवू शकता. केस जलद वाढवण्यासाठी हा उपाय करून पहा. तांदळाच्या पाण्याचं हे मिश्रण केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. यामुळे केसांना चमक येते, केस मजबूत आणि मऊ देखील होतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 14, 2025 9:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Growth : केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय, तुमच्या घरातच आहे उत्तर