advertisement

Eyesight : डोळ्यांसाठी पौष्टीक आहार, नैसर्गिक घटकांनी वाढेल डोळ्यांची ताकद

Last Updated:

दृष्टीची ताकद वाढवण्यासाठी इतरही काही पर्याय आहेत. स्क्रीन टाइम वाढलेला असल्यानं डोळ्यांचं आरोग्य राखणं खूप महत्वाचं आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी, आंबा, काजू, संत्र, पालक यासारखे पर्यायही नक्की वापरुन पाहा.

News18
News18
मुंबई : डोळ्यांसंदर्भात काहीही तक्रार असली तरी तुमच्या आहारात गाजर आहे का असा प्रश्न हमखास विचारला जातो. गाजरातले अनेक गुणधर्म दृष्टी सुधारण्यासाठी मदत करू शकतात. पण चांगल्या दृष्टीसाठी फक्त गाजरांवर अवलंबून राहणं योग्य नाही.
दृष्टीची ताकद वाढवण्यासाठी इतरही काही पर्याय आहेत. स्क्रीन टाइम वाढलेला असल्यानं डोळ्यांचं आरोग्य राखणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी अन्य पर्यायांची माहिती करुन घेऊया.
1. आंबा
आंब्यात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असतं, ज्याचा दृष्टी सुधारण्यासाठी उपयोग होतो. यामुळे डोळे कोरडे होण्याची समस्या कमी होते.
advertisement
2. कारलं
कारल्यात व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन असतं, ज्यामुळे मोतीबिंदूसारख्या समस्या टाळण्यास मदत होते. यामुळे काळी वर्तुळं कमी करण्यासाठी आणि दृष्टी मजबूत करण्यासाठीही उपयोग होतो.
3. काजू
काजूत झेक्सॅन्थिन अँटीऑक्सिडंट असतं, ज्यामुळे डोळ्यांचं अतिनील किरणांपासून आणि प्रदूषणापासून संरक्षण होतं. यामुळे रेटिनाचं संरक्षण होतं आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
advertisement
4. संत्रा
संत्र्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, यामुळे डोळ्यांच्या पेशींना बळकटी मिळते आणि दृष्टी सुधारते. डोळ्यांची जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी देखील संत्र उपयुक्त आहे.
5. पालक
पालकात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असतं, यामुळे डोळ्यांचं हानिकारक प्रकाशापासून संरक्षण होतं. यामुळे रेटिनाचं संरक्षण होतं आणि डोळ्यांचा थकवा कमी होतो. दृष्टी सुधारायची असेल तर आहारात या पाच पर्यायांचा समावेश नक्की करा. यामुळे दृष्टी तर सुधारेलच पण डोळ्यांचं आरोग्यही चांगलं राहील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Eyesight : डोळ्यांसाठी पौष्टीक आहार, नैसर्गिक घटकांनी वाढेल डोळ्यांची ताकद
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement