Udad Dal : उडीद डाळ खा, तंदुरुस्त राहा, तब्येतीसाठीचा पौष्टिक आहार

Last Updated:

उडदाची डाळ खाणाऱ्या व्यक्तीला मांसाहारी पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीइतकीच ऊर्जा मिळते. आयुर्वेदातही हा उल्लेख आहे. उडदाच्या डाळीत चांगल्या कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं, चरबी, फायबर आणि इतर अनेक जीवनसत्त्व आणि खनिजं असतात. त्यामुळे प्रथिनांचं पॉवरहाऊस शरीरासाठीचा चांगला ऊर्जा स्रोत आहे.

News18
News18
मुंबई : आपलं स्वयंपाकघर फक्त जेवणासाठी नाही तर अनेक उपायांसाठीही महत्त्वाचं आहे. कारण यातल्या अनेक गोष्टींत औषधी गुणधर्म असल्यानं आपल्या प्रकृतीसाठी ते उत्तम आहे.
आहारात, वडा, डोसा आणि इडली बनवण्यासाठी उडद डाळीचा वापर होतो. या डाळीत असलेली पौष्टिक मूल्यांची तुलना मांसाहारी पदार्थांशी केली आहे. याचा अर्थ असा की उडदाची डाळ खाणाऱ्या व्यक्तीला मांसाहारी पदार्थ खाणाऱ्या व्यक्तीइतकीच ऊर्जा मिळते. आयुर्वेदातही हा उल्लेख आहे. उडदाच्या डाळीत चांगल्या कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, प्रथिनं, चरबी, फायबर आणि इतर अनेक जीवनसत्त्व आणि खनिजं असतात.
advertisement
या डाळीनं शरीरात प्रथिनांचं प्रमाण तर वाढेलच पण शक्तीही मिळेल. इतर डाळींतही जीवनसत्त्व आणि खनिजं आढळतात, पण उडीद डाळीइतकी शक्ती त्यात नाही.
उडद डाळ खाण्याचे फायदे -
1- हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त - उडीद डाळीत कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम यासारखे आवश्यक पोषक घटक असतात. हाडं मजबूत करण्यासाठी हे घटक मदत करतात. महिला आणि वृद्धांच्या आहारात या डाळीचा समावेश करावा.
advertisement
2-पचन - या डाळीमध्ये भरपूर फायबर असतं, यामुळे पोट स्वच्छ ठेवण्यास मदत होते. बद्धकोष्ठता दूर करण्यासोबतच, यामुळे आतड्यांच्या आरोग्यासाठीही ही डाळ उपयुक्त आहे.
3-ऊर्जा - उडीद डाळीत असलेल्या कर्बोदकांमुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते, शरीरात बराच काळ टिकण्याची क्षमता यात असते. म्हणून, सकाळी किंवा दुपारच्या जेवणात उडद डाळ समाविष्ट करणं हा एक चांगला पर्याय आहे.
advertisement
4-मधुमेह आणि हृदयरोग्यांसाठी फायदेशीर - पांढरी उडदाची डाळ रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. त्यातले फायबर आणि पोटॅशियममुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात मदत होते, ज्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
5-त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर - उडद डाळीत प्रथिनं आणि लोह भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे केस निरोगी आणि त्वचा चांगली राहते. त्याची पेस्ट त्वचेवर लावल्यानं मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा स्वच्छ होते.
advertisement
उडदाची डाळ खूप फायदेशीर असली तरी काहींना त्रासदायक ठरु शकते -
पोटात गॅस किंवा अपचनाची समस्या असलेल्यांनी ही डाळ खाऊ नये.
संधिवाताच्या रुग्णांनी खाऊ नये.
मूतखड्याचा त्रास असलेल्यांनी खाऊ नये.
त्वचेची अ‍ॅलर्जी किंवा एक्झिमा असलेल्यांनीही उडद डाळ खाऊ नये.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Udad Dal : उडीद डाळ खा, तंदुरुस्त राहा, तब्येतीसाठीचा पौष्टिक आहार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement