Heart : हे पदार्थ खा, हृदयाचं आरोग्य जपा, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही उपयुक्त

Last Updated:

हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते. हृदय निरोगी आणि मजबूत ठेवायचं असेल तर आहारात असे पदार्थ खा, जे हृदयाला अनुकूल असतील आणि एचडीएल वाढवतील. हे खास पदार्थ कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतील आणि हृदय निरोगी ठेवतील.

News18
News18
मुंबई : जीवनशैलीतले बदल आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे हृदयरोगाचा धोका वाढतोय. त्यामुळे आहारात काही बदल करण्याची आवश्यकता आहे. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवणारे पदार्थ आहारात असणं सर्वात जास्त गरजेचं आहे.
हाय कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोग होऊ शकतो. हृदय निरोगी आणि मजबूत ठेवायचं असेल तर आहारात असे पदार्थ खा, जे हृदयाला अनुकूल असतील आणि एचडीएल वाढवतील. हे खास पदार्थ कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतील आणि हृदय निरोगी ठेवतील.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे पदार्थ खा -
advertisement
1. हिरव्या पालेभाज्या
हिरव्या भाज्यांमधे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.
पालक, मेथी आणि ब्रोकोलीसारख्या भाज्यांमुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि धमन्या स्वच्छ ठेवण्यास मदत होते.
2. मासे ( ओमेगा-3 फॅटी एसिड)
माशांमधे ओमेगा-3 फॅटी एसिड असतात, यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यासाठी मदत होते. सॅल्मन, ट्यूना आणि मॅकरेलसारखे मासे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असतात.
advertisement
3. लसूण
लसणात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासठी मदत होते. दररोज लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या खाल्ल्यानं हृदयरोगाचा धोका कमी होतो.
4. डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेटमधे कोको फ्लेव्होनॉइड्स असतात, यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मदत होते. पण, हे जास्त प्रमाणात खाणं चांगलं नाही, कारण त्यात साखर आणि चरबी देखील असते.
advertisement
5. ओट्स
ओट्समधे बीटा-ग्लुकॉन फायबर असतं, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाच्या धमन्या स्वच्छ ठेवण्यासाठी याची मदत होते. दररोज नाश्त्यात ओट्स खाल्ल्यानं हृदयरोगाचा धोका कमी होतो. हृदयरोग टाळायचा असेल तर आहारात हे पाच पदार्थ नक्की ठेवा. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याबरोबरच हृदय मजबूत आणि निरोगी ठेवण्यातही याची मदत होईल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Heart : हे पदार्थ खा, हृदयाचं आरोग्य जपा, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठीही उपयुक्त
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement