Knee Pain : गुडघेदुखी कमी करण्यासाठी घरी बनवा तेल, आजीच्या बटव्यातलं खास औषध

Last Updated:

जसजसं वय वाढतं तसतसा गुडघेदुखीचा त्रास वाढतो आणि स्नायूंमध्येही वेदना सुरु होतात. अशा वेळी, जास्त औषधं घेण्याऐवजी, घरी मालिश करण्यासाठी तेलाचा वापर केला जाऊ शकतो. हे आयुर्वेदिक तेल घरी बनवता येतं.

News18
News18
मुंबई : शरीर हे एक मशीन आहे, जसं मशिनला सर्व्हिसिंग लागतं तसं शरीराचे काही भागही वय वाढलं की किंवा अन्य कारणानं कुरकुर करतात. वय वाढत असताना, हाडं कमकुवत होऊ लागतात. यामुळे एखादी जखम झाली किंवा काही वेदना जाणवली तर ती बराच काळ टिकते.
जसजसं वय वाढतं तसतसा गुडघेदुखीचा त्रास वाढतो आणि स्नायूंमधेही वेदना सुरु होतात. अशा वेळी, जास्त औषधं घेण्याऐवजी, घरी मालिश करण्यासाठी तेलाचा वापर केला जाऊ शकतो. डॉ. आशना यांनी त्यांच्या आजीनं सांगितलेली रेसिपी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामुळे सांधेदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो. हे आयुर्वेदिक तेल घरी बनवता येतं.
advertisement
या तेलानं गुडघ्यांना मालिश केल्यानं गुडघेदुखीपासून आराम मिळू शकतो.
गुडघेदुखी कमी करण्यासाठी घरगुती तेल -
हे आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी एक कप तीळाचं तेल, सात-आठ लसूण पाकळ्या, एक चमचा ओवा, चार ते पाच लवंगा, एक जाड वेलची, अर्धा चमचा सुंठ पावडर आणि एक चतुर्थांश चमचा जायफळ असं साहित्य लागेल.
तेल बनवण्यासाठी, सर्व साहित्य तीळाच्या तेलात घाला आणि मंद आचेवर उकळा. लसूण सोनेरी रंगाचा होऊन सुगंध येऊ लागेल तेव्हा गॅस बंद करा. तेल तयार आहे. हलक्या मालिशसाठी हे तेल वापरा. ​​दररोज रात्री झोपण्यापूर्वी या तेलानं गुडघ्याला मालिश केल्यानं वेदना कमी होतात.
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा -
या तेलानं गुडघ्यांना मसाज करण्यापूर्वी, पॅच टेस्ट करा. पॅच टेस्ट करण्यासाठी, ते त्वचेच्या एखाद्या भागावर लावा आणि नंतर काही वेळ ठेवल्यानंतर, जळजळ होते का ते पहा. काही अडचण नसेल तर हे तेल मालिशसाठी वापरू शकता. गुडघ्यावर कोणतीही दुखापत झाली असेल किंवा त्वचा कापली गेली असेल किंवा फाटली असेल तर तेल वापरू नका. दुखापतीवर तेल वापरल्यानं त्रास वाढू शकतो. हे तेल कोरड्या आणि थंड जागी ठेवा. या तेलामुळे वेदना कमी होण्यासाठी मदत होईल पण हे तेल त्यासाठीचा कायमस्वरुपी उपाय नाही. त्यामुळे गुडघेदुखीकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Knee Pain : गुडघेदुखी कमी करण्यासाठी घरी बनवा तेल, आजीच्या बटव्यातलं खास औषध
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement