Fig Water : आरोग्यासाठी हितकारक - अंजीराचं पाणी, शरीरासाठी खूप उपयुक्त

Last Updated:

शरीरासाठी अंजीर फायदेशीर आहे. यात फायबर, जीवनसत्त्व आणि खनिज आहेत. सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचं पाणी प्यायल्यानं शरीराचं अनेक समस्यांपासून संरक्षण होऊ शकतं.

News18
News18
मुंबई : आपल्या नेहमीच्या जेवणाव्यतिरिक्त ड्राय फ्रूट्सही प्रकृतीसाठी फायदेशीर आहेत. त्यातलंच एक म्हणजे अंजीर. अंजीर आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानलं जातं. अंजीर नुसतंही खाता येतंच पण याचं पाणीही आरोग्यासाठी हितकारक आहे.
अंजीर मिल्कशेक, अंजीर बर्फी अशा अनेक प्रकारच्या पाककृती अंजीरापासून बनवता येतात. यामुळे पदार्थाचा स्वाद वाढतोच शिवाय शरीरासाठीही अंजीर फायदेशीर आहे. यात फायबर, जीवनसत्त्व आणि खनिज आहेत. सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचं पाणी प्यायल्यानं शरीराचं अनेक समस्यांपासून संरक्षण होऊ शकतं.
advertisement
अंजीर पाणी बनवण्यासाठी, प्रथम अंजीर स्वच्छ पाण्यानं धुवा आणि नंतर एका भांड्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या.
अंजीराचं पाणी पिण्याचे फायदे -
1. पचन - अंजीरात जास्त फायबर असल्यानं पचनक्रिया सुधारते आणि पोट फुगणं, गॅस आणि आम्लता यासारख्या समस्या कमी होतात. ज्यांना पचनाच्या समस्या आहेत ते हे पाणी पिऊ शकतात.
advertisement
2. हृदय - अंजीराच्या पाण्यात फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. हे पाणी प्यायल्यानं हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
3. लठ्ठपणा - वाढलेलं वजन कमी करायचं असेल, तर त्यासाठीही अंजीर उपयुक्त आहे. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी पिऊ शकता.
advertisement
4. त्वचा - अंजीराच्या पाण्यात जीवनसत्त्व आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते.
5. रक्तातील साखर - अंजीरामधे क्लोरोजेनिक एसिड असतं, यामुळे शरीरात ग्लुकोज चयापचय वाढवण्यास मदत होते. तसंच, अंजीरात असलेलं फायबर रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.
अंजीराचं पाणी हे आरोग्यवर्धक पेय आहे. त्वचा, हाडं, हृदयाचं आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं या सगळ्यासाठी अंजीर उपयुक्त ठरतं.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Fig Water : आरोग्यासाठी हितकारक - अंजीराचं पाणी, शरीरासाठी खूप उपयुक्त
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement