Skin Care : त्वचेसाठी नैसर्गिक आणि सोपा उपाय, नारळाच्या तेलानं त्वचा होईल मऊ

Last Updated:

आंघोळीपूर्वी नारळाचं तेल चेहऱ्यावर लावणं हा त्वचेसाठी फायदेशीर पर्याय आहे. यामुळे त्वचा चमकदार, मऊ आणि निरोगी होते. या तेलामुळे त्वचेला थंडावा मिळतो.

News18
News18
मुंबई : उन्हाळ्यात घाम येणं, चिकट वाटणं, मुरुमं येणं असे प्रकार होतातच. अनेक प्रयत्न करूनही, अनेक वेळा त्याचं प्रमाण कमी होत नाही. पण, आंघोळीपूर्वी एक छोटासा घरगुती उपाय केला तर त्वचेला नैसर्गिक चमक आणि थंडावा मिळतो.
आंघोळीपूर्वी नारळाचं तेल चेहऱ्यावर लावणं हा त्वचेसाठी फायदेशीर पर्याय आहे. यामुळे त्वचा चमकदार, मऊ आणि निरोगी होते. या तेलामुळे त्वचेला थंडावा मिळतो.
1. यासाठी, एक चमचा शुद्ध नारळ तेल घ्या आणि ते दोन - तीन मिनिटं वर्तुळाकार पद्धतीनं लावत चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करा. ते तीस मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्यानं चेहरा धुवा. यामुळे, रक्ताभिसरण वाढेल, मृत त्वचा निघून जाईल आणि त्वचा आतून मऊ होईल, चेहऱ्यावर चमक येईल.
advertisement
2. दुसरा पर्याय म्हणजे नारळ तेल आणि गुलाबपाणी हे मिश्रण. दोन चमचे नारळाच्या तेलात काही थेंब गुलाबजल मिसळा आणि ते चेहऱ्यावर लावा आणि वीस पंचवीस मिनिटं तसंच राहू द्या. नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. गुलाबपाण्यानं त्वचेला चांगला टोन मिळतो आणि नारळ तेलानं त्वचा खोलवर मॉइश्चरायझ करता येते. उन्हाळ्यात, या मिश्रणानं त्वचा मऊ आणि थंड होते.
advertisement
3. नारळ तेल आणि डाळीचं पीठ - दोन चमचे डाळीचं पीठ आणि समान प्रमाणात नारळ तेल मिसळा आणि ते पेस्टसारखं चेहऱ्यावर लावा आणि अर्धा तास तसंच राहू द्या. कोरडं झालं की कोमट पाण्यानं धुवा. डाळीच्या पीठानं त्वचा स्वच्छ होते, टॅन काढता येतं आणि चमक येते. नारळ तेलानं त्वचेचा ओलावा वाढतो, त्यामुळे त्वचा कोरडी वाटत नाही. यामुळे चेहरा स्वच्छ, चमकदार आणि ताजा दिसतो.
advertisement
4. मुलतानी माती आणि नारळ तेल - त्वचेला थंडावा देण्यासाठी, आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर मुलतानी माती आणि नारळ तेल लावू शकता. दोन चमचे मुलतानी माती नारळाच्या तेलात मिसळून एक पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पूर्णपणे वाळल्यावर धुवा. मुलतानी मातीनं त्वचेवरील धूळ, घाण आणि तेल काढून टाकण्यासाठी मदत होते, नारळाच्या तेलानं त्वचा थंड होते आणि त्वचेला पोषण मिळतं. उन्हाळ्यात होणारी जळजळ या मास्कमुळे कमी होईल.
advertisement
5. आंघोळीपूर्वी नारळ तेल आणि चंदन पावडर लावल्यानं त्वचेला ताजेपणा जाणवतो. नारळ तेलात दोन चमचे चंदन पावडर मिसळून एक पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावा आणि वीस - पंचवीस मिनिटं तसंच राहू द्या. त्यानंतर चेहरा धुवा. चंदनामुळे त्वचेला थंडावा मिळतो. लालसरपणा, मुरुम आणि जळजळ कमी होते. नारळाच्या तेलानं त्वचा त्वरित चमकदार दिसते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care : त्वचेसाठी नैसर्गिक आणि सोपा उपाय, नारळाच्या तेलानं त्वचा होईल मऊ
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement