Digestion : दही - त्रिफळा मिश्रण - पचनसंस्था चांगली ठेवण्यासाठी पारंपरिक उपाय

Last Updated:

पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या टाळायच्या असतील तर दही हा उत्तम उपाय आहे. त्रिफळा हे आयुर्वेदाचं एक प्रसिद्ध हर्बल मिश्रण आहे, ज्यामध्ये हिरडा, बहेडा आणि आवळा असतो. त्यामुळे दही - त्रिफळा हे मिश्रण पचनसंस्थेसाठी उत्तम आहे.

News18
News18
मुंबई : पचनसंस्था मजबूत असेल तर तुमची तब्येत चांगली असते. पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या टाळायच्या असतील तर दही हा उत्तम उपाय आहे. त्रिफळा हे आयुर्वेदाचं एक प्रसिद्ध हर्बल मिश्रण आहे, ज्यामध्ये हिरडा, बहेडा आणि आवळा असतो. त्यामुळे दही - त्रिफळा हे मिश्रण पचनसंस्थेसाठी उत्तम आहे.
advertisement
या तीन औषधी वनस्पती आतडी स्वच्छ करण्यासाठी आणि शरीराला विषमुक्त करण्यासाठी मदत करतात. दह्यासोबत त्रिफळा मिसळून खाणं पोट आणि पचनक्रियेसाठी उपयुक्त आहे. हे नियमित खाल्ल्यानं चयापचयाची गती वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
advertisement
पचनसंस्थेचे विकार, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीशी संबंधित बदलांमुळे पोट व्यवस्थित स्वच्छ  होत नाही. आहारात फायबरची कमतरता, पाण्याची कमतरता, ताणतणाव आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय, जास्त प्रक्रिया केलेलं अन्न, तळलेलं अन्न आणि असंतुलित आहारामुळेही आतडी स्वच्छ होत नाहीत. पोट स्वच्छ होत नसेल तर कोमट पाणी, फायबरयुक्त पदार्थ आणि नियमित व्यायाम केल्यानं पोटाच्या समस्या कमी होतील.
advertisement
त्रिफळा आणि दही खाण्याचे फायदे -
- त्रिफळा आणि दह्यात असलेले प्रोबायोटिक्समुळे आतडी स्वच्छ होण्यासाठी मदत होते.
- त्रिफळा आणि दही नियमित खाल्ल्यानं बद्धकोष्ठता आणि गॅसपासून आराम मिळतो. हे खाल्ल्यानं आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
-  शरीरातून हानिकारक विषारी पदार्थ यामुळे बाहेर काढले जातात, ज्यामुळे त्वचा देखील चमकदार होते.
advertisement
- दह्यात असलेल्या चांगल्या बॅक्टेरियामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- त्रिफळा आणि दही या मिश्रणानं चयापचय गतिमान होतं आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी तीस मिनिटं आधी एक चमचा त्रिफळा पावडर घ्या. ते एका वाटी ताज्या दह्यात घाला आणि चांगलं मिसळा. ते हळूहळू खा आणि या काळात पाणी पिणं टाळा. अ‍ॅसिडिटी किंवा जास्त गॅस असेल तर त्रिफळाचं प्रमाण कमी ठेवा. गर्भवती महिलांनी ते घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणतंही औषध घेत असाल तर त्रिफळा आणि दही खाण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Digestion : दही - त्रिफळा मिश्रण - पचनसंस्था चांगली ठेवण्यासाठी पारंपरिक उपाय
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement