Moisturizer: घरीच बनवा मॉईश्चरायझर, बदाम, गुलाबपाण्यानं त्वचा राहिल हायड्रेटेट

Last Updated:

चेहऱ्यासाठी घरगुती आणि सहज मिळणाऱ्या साहित्यातूनच मॉइश्चरायझर बनवता येतं. कोरफडीचा गर, बदामाचं तेल आणि गुलाबपाणी वापरुन घरीच मॉइश्चरायझर तयार करता येईल. 

News18
News18
मुंबई: प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो. काहींची कोरडी तर काहींची तेलकट असते. त्वचा खूप तेलकट किंवा कोरडी नसेल आणि चेहऱ्यावर छिद्र किंवा डाग दिसत नसतील, तर त्वचेचा पोत चांगला राहतो. अशावेळी, त्वचेचा पोत टिकवून ठेवण्यासाठी आणि त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी काही नैसर्गिक घटकांची आवश्यकता आहे. घरगुती स्किन मॉइश्चरायझर्स त्वचेला नैसर्गिकरित्या पोषण देण्यास मदत करतात.
चेहऱ्यासाठी घरगुती आणि सहज मिळणाऱ्या साहित्यातूनच मॉइश्चरायझर बनवता येतं. कोरफडीचा गर, बदामाचं तेल आणि गुलाबपाणी वापरुन घरीच मॉइश्चरायझर तयार करता येईल. 
कोरफड आणि बदाम तेल मॉइश्चरायझर -
कोरफड आणि बदाम तेलाचं हे मिश्रण हलक्या स्वरुपाचं आहे. घरी मॉइश्चरायझर बनवण्यासाठी, अर्धा कप कोरफड जेल, दोन टेबलस्पून जोजोबा किंवा बदाम तेल, 5-6 थेंब लव्हेंडर इसेन्शियल तेल एका मोठ्या भांड्यात एकत्र मिसळा. वापरा आणि हवाबंद डब्यात ठेवा.  
advertisement
गुलाब पाणी आणि कोरफडीचं मॉइश्चरायझर -
गुलाब हे बॅक्टेरियाविरोधी आणि दाहक-विरोधी आहे. ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगलं आहे. बदामाचं तेल हलकं असतं आणि यामुळे छिद्र बंद होत नाहीत. हे मॉइश्चरायझर घरी बनवण्यासाठी, पाव कप बदाम तेल, 1/8 कप मेण, 1/4 कप कोरफड जेल डबल बॉयलरमध्ये, बदाम तेल आणि मेण एकत्र करा आणि पूर्णपणे वितळू द्या. तेल आणि मेणाचं मिश्रण, कोरफड जेल, गुलाब पाणी आणि तेल मिसळा आणि मॉइश्चरायझर म्हणून वापरा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Moisturizer: घरीच बनवा मॉईश्चरायझर, बदाम, गुलाबपाण्यानं त्वचा राहिल हायड्रेटेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement