Blood Donation : जागतिक रक्तदाता दिवस, मासिक पाळी दरम्यान रक्तदान करता येतं का ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
रक्तदान हे जीवन वाचवणारं कार्य आहे, पण रक्तदात्याचं आरोग्य आणि सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे. रक्तदान करण्यापूर्वी आरोग्य चांगलं असणं, पुरेशी झोप घेणं आणि तुमच्या वैद्यकीय स्थितीची स्पष्ट कल्पना असणं महत्वाचं आहे. याबाबत काही शंका असल्यास, डॉक्टरांचा किंवा रक्तपेढीच्या स्वयंसेवकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
मुंबई : दरवर्षी 14 जून हा दिवस जगभरात जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. पण मासिक पाळी दरम्यान, ताप असताना किंवा कोणतंही औषध घेत असताना रक्तदान करता येतं का असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.
रक्तदान हे ज्याला रक्तदान केलं जातं त्याच्यासाठीच नव्हे तर रक्तदात्यासाठी देखील पूर्णपणे सुरक्षित असलं पाहिजे. मासिक पाळी दरम्यान रक्तदान करण्यास कोणतीही अडचण नसते पण, मासिक पाळीत रक्त कमी होऊ शकतं, यामुळे शरीरात लोहाची कमतरता, अॅनिमिया होण्याची शक्यता वाढते. म्हणून, भारतीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार महिलांना या काळात रक्तदान पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जाताे.
advertisement
* ताप हा शरीरात संसर्ग किंवा आजाराचं चिन्ह आहे. एखाद्याला विषाणूजन्य ताप, फ्लू, डेंग्यू, मलेरिया किंवा टायफॉइड असेल तर त्यांनी पूर्णपणे बरं झाल्यानंतरच रक्तदान करावं. साधारणपणे, ताप कमी झाल्यानंतर रक्तदान कमीत कमी दोन आठवडे पुढे ढकललं पाहिजे अशी शिफारस डॉक्टर करतात.
advertisement
* मलेरियापासून बरं झाल्यानंतर - तीन महिने, डेंग्यू / चिकनगुनिया झाला असेल तर सहा महिने, आणि टायफॉइड झाला असेल तर बारा महिन्यांनंतर रक्तदान करण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून, जर अलीकडेच ताप आला असेल तर रक्तदान केंद्राच्या कर्मचाऱ्यांना नक्की कळवा.
* औषधं घेत असताना रक्तदान करावं का :
advertisement
* पॅरासिटामॉल, जीवनसत्त्वं म्हणजेच व्हिटामिनच्या गोळ्या, गर्भनिरोधक यासारखी सामान्य औषधं सुरु असतील आणि अन्यथा जर ही व्यक्ती निरोगी असेल तर रक्तदान शक्य आहे.
* अँटीबायोटिक्स घेणाऱ्यांनी - संसर्ग पूर्णपणे बरा होईपर्यंत आणि शेवटच्या डोसपासून किमान दोन आठवडे पूर्ण होईपर्यंत रक्तदान करू नये.
रक्तदान हे जीवन वाचवणारं कार्य आहे, पण रक्तदात्याचं आरोग्य आणि सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे. रक्तदान करण्यापूर्वी आरोग्य चांगलं असणं, पुरेशी झोप घेणं आणि तुमच्या वैद्यकीय स्थितीची स्पष्ट कल्पना असणं महत्वाचं आहे. याबाबत काही शंका असल्यास, डॉक्टरांचा किंवा रक्तपेढीच्या स्वयंसेवकांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 14, 2025 8:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Blood Donation : जागतिक रक्तदाता दिवस, मासिक पाळी दरम्यान रक्तदान करता येतं का ?