Digestion : पचनाच्या समस्या टाळा, आरोग्य सांभाळा, वाचा सविस्तर माहिती

Last Updated:

अ‍ॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, इरिटेबल बोवेल सिंड्रोम आणि अपचन यासारख्या समस्यांचं प्रमाण वाढतंय. ही केवळ तरुणांसाठी चिंतेची बाब नाही तर त्याची कारणं ओळखणं आणि या समस्या टाळण्यासाठी उपाय शोधणं देखील महत्त्वाचं आहे.

News18
News18
मुंबई : पचन आणि पोटाशी संबंधित समस्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय. अ‍ॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) आणि अपचन यासारख्या समस्यांचा जास्त सामना करावा लागत आहे. ही केवळ तरुणांसाठी चिंतेची बाब नाही तर त्याची कारणं ओळखणं आणि या समस्या टाळण्यासाठी उपाय शोधणं देखील महत्त्वाचं आहे.
तरुणपणी पोटाच्या समस्यांची कारणं -
1. खाण्याच्या चुकीच्या सवयी
आजच्या पिढीत जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न म्हणजेच प्रोसेस्ड फूड आणि तळलेल्या पदार्थांचं सेवन वाढलं आहे. त्यात फायबरची कमतरता असते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.
2. असंतुलित जीवनशैली
रात्री उशिरापर्यंत जागणं, शरीराला आवश्यक पुरेशी झोप न घेणं आणि शारीरिक हालचालींचा अभाव याचाही पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.
advertisement
3. ताण आणि मानसिक दबाव
कामाच्या पद्धती आणि वैयक्तिक जीवनातील समस्यांमुळे ताणतणाव आणि चिंता वाढत आहेत. याचा परिणाम आतड्याच्या आरोग्यावर होतो, ज्यामुळे आम्लपित्त आणि अपचन होते.
4. कमी पाणी पिणं
पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होऊ शकतं, ज्यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या वाढतात. म्हणून, हायड्रेटेड राहणं महत्त्वाचं.
5. चुकीचे अन्न संयोजन
advertisement
काही जण फास्ट फूड आणि कोल्ड्रिंक्स एकत्र घेतात, ज्यामुळे पचनसंस्थेवर अतिरिक्त दबाव येतो आणि पोटाच्या समस्या निर्माण होतात.
पोटाच्या समस्या कशा टाळता येतील?
1. संतुलित आहार : आहारात फायबर असलेली फळं, भाज्या, दही, ओमेगा-3 फॅटी एसिड आणि कमी कार्बयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करा. जंक फूड टाळा.
advertisement
2. पाण्याचं प्रमाण वाढवा: दिवसभरात आठ-दहा ग्लास पाणी प्या. कोमट पाणी आणि हर्बल टीमुळेही पचन सुधारण्यासाठी मदत होते.
3. सक्रिय राहा : दररोज योगा, व्यायाम करा किंवा चालायला जा. शारीरिक हालचालींमुळे पचनसंस्था मजबूत होते.
4. ताण कमी करा: ध्यान, संगीत आणि पुरेशी झोप घेतल्यानं ताण कमी करणं शक्य आहे. मानसिक शांतीमुळेही पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते.
advertisement
5. जेवणाची पद्धत आणि योग्य वेळ पाळा: अन्न चांगलं चावून खा, खूप लवकर खाऊ नंका. रात्री झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी जेवा.
पचनाच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली सुधारण्याची गरज आहे.
संतुलित आहार, सक्रिय जीवनशैली, योग्य प्रमाणात पाणी पिणं आणि ताणतणाव नियंत्रित करून पोट आणि पचनाच्या समस्या सहजपणे टाळता येतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Digestion : पचनाच्या समस्या टाळा, आरोग्य सांभाळा, वाचा सविस्तर माहिती
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement