TRENDING:

नको ती वाढलेली चरबी लगेच होईल कमी, किचनमधील या पदार्थाचं नियमित करा सेवन!

Last Updated:

आपल्या रोजच्या वापरातील मीठापेक्षा हे सैंधव मीठ कितीतरी पटीने आरोग्यासाठी चांगले असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर,03 नोव्हेंबर : खरंतर कोणताही पदार्थ हा मिठाशिवाय बेचव होऊन जातो. त्यामुळेच आपण सर्वजण समुद्राच्या पाण्यापासून बनवलेल्या मिठाचा नेहमीच वापर करतो. तर मिठाचाच आणखी एक प्रकार म्हणजे रॉक सॉल्ट किंवा सैंधव मीठ. आपल्या रोजच्या वापरातील मीठापेक्षा हे सैंधव मीठ कितीतरी पटीने आरोग्यासाठी चांगले असते. त्यामुळे बरेच जण सैंधव मिठाचा वापर आपल्या आहारात करत असतात. त्यातच सध्या कोल्हापुरात बऱ्याच ठिकाणी बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात सैंधव मीठ विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे आपण विकत घेतलेले सैंधव मीठ हे कितपत शुद्ध आहे, हे देखील तपासणे गरजेचे बनले आहे.
advertisement

खरंतर आरोग्यदायी राहणीमान असणारे लोक हे जास्तीत जास्त सैंधव मिठाचेच सेवन करतात. मात्र सैंधव मीठ हे मीठ आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि त्याची शुद्धता कशी पडताळून पाहण्याबाबतची माहिती कोल्हापूरचे आयुर्वेदीक डॉक्टर अनिल वैद्य यांनी दिली आहे.

नितळ आणि चमकदार त्वचा हवीय? मग मसूर डाळीचा करा असाही वापर; होईल फायदा

advertisement

कसे असते सैंधव मीठ

खरंतर आयुर्वेदात पाच प्रकारच्या मिठांचा उल्लेख पाहायला मिळतो. संस्कृत मध्ये मिठाला लवण असे म्हणतात. त्यातीलच सर्वात श्रेष्ठ मीठ म्हणून सैंधव मिठाकडे पाहिले जाते. अनेक औषधी गुणधर्मामुळे बऱ्याच औषधांमध्ये सैंधव मिठाचा वापर आढळतो. त्यामुळे सैंधव मीठ हे हृदयविकाराने किंवा मधुमेहाने ग्रस्त लोक खास करुन वापरतात. हे सैंधव मीठ हिमालयीन प्रांतातून विशेषतः सिंध प्रांतातून भारतात येते. लालसर गुलाबी रंगाच्या दगडाच्या स्वरुपात आपल्याला हे मीठ पाहायला मिळते. या मिठाचे नैसर्गिक डोंगर असतात. म्हणूनच याला रॉक सॉल्ट म्हटले जाते, असे डॉक्टर अनिल वैद्य यांनी सांगितले आहे.

advertisement

कशी पाहावी मिठाची शुध्दता?

सैंधव मीठ शुद्ध आहे की भेसळयुक्त हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट करता येतात. त्याच्यामध्ये असणारे सोडियमचे प्रमाण किती आहे, हे ॲनालिटिकल स्टडीच्या माध्यमातून पाहता येते. हा ॲनालिटिकल स्टडी वेगवेगळ्या टेस्ट करून केला जातो. यातून त्या सैंधव मिठाची गुणवत्ता आणि शुद्धता पाहता येते, असेही वैद्य यांनी सांगितले.

Health Tips : प्रदूषणामुळे नाक आणि घश्यातील इंफेक्शनने त्रस्त आहात? 4 घरगुती उपाय देतील आराम

advertisement

घरातच कशी पाहावी सैंधव मिठाची शुद्धता?

घरगुती पद्धतीने देखील आपण सैंधव मिठाची शुद्धता तपासू शकतो. त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात सैंधव मिठाचा खडा टाकावा आणि ते मीठ त्या पाण्यात विरघळू द्यावे. शुद्ध सैंधव मीठ पूर्णपणे पाण्यात विरघळून जाईल. त्याचा कोणताही खडा स्वरूपातील अंश शिल्लक राहणार नाही. अन्यथा त्याच्यामध्ये चॉक अर्थात कॅल्शियम कार्बोनेटची भेसळ केली असू शकते, अशी माहिती डॉ. वैद्य यांनी दिली आहे.

advertisement

सैंधव मीठ खाण्याचे फायदे

1. सैंधव मीठात सोडियमचे प्रमाण हे समुद्री मिठापेक्षा कमी असते. खरंतर शरीरात सोडियमचं प्रमाण वाढल्यास तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांनाही बळी पडू शकता.

2. सैंधव मीठाच्या सेवनाने पचन प्रणाली सुधारते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.

3. सैंधव मीठातील मॅग्नेशियम, कॅल्शियम, फेरस आदी शरीराला आवश्यक पोषक आणि खनिज पदार्थांमुळे याचे सेवन केल्याने शरीराला उर्जा मिळते.

4. रोजच्या जेवणात सैंधव मीठाचा समावेश केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तसेच शरीरातील पीएच पातळी योग्य प्रमाणात राखण्यासही सैंधव उपयुक्त ठरते.

5. शरीरातील चरबी कमी करण्यास सैंधव मीठ फायदेशीर आहे. वजन कमी करताना सैंधव मिठाचे सेवन करण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो.

डायबिटीजचे रुग्णही बिनधास्त खाऊ शकतात गोड, फक्त मिठाईत साखरेऐवजी घाला हे गोड पदार्थ

दरम्यान समुद्री मिठात आढळणारे सोडियम हे वजन वाढवण्याचे आणि रक्ताच्या नसांमध्ये पाणी वाढवण्याचे काम करते. त्यामुळे जास्त प्रमाणात सैंधव खाणे हे देखील आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते, असे देखील वैद्य यांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
नको ती वाढलेली चरबी लगेच होईल कमी, किचनमधील या पदार्थाचं नियमित करा सेवन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल