TRENDING:

वजन कमी करायचंय? असा फॉलो करा आहार, नक्की होईल फायदा

Last Updated:

वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम हा करत असतो. पण यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा आपला आहार असतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी 
advertisement

छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेक जणांना वजन वाढीची समस्या असते. वजन वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम हा करत असतो. पण यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा आपला आहार असतो. तुम्ही वजन कमी करत असाल तर तुमचा आहार कसा असावा? काय खावं किंवा काय खाऊ नये? याविषयीच आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे.

advertisement

आहार कसा असावा?

तुमचं जर वजन वाढलं असेल तर तुम्हाला व्यायाम हा करावाच लागेल. पण व्यायामाबरोबरच आहार चांगला असणं गरजेचं आहे. तुम्ही वजन कमी करत असाल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दिवसभरामध्ये भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवं. कमीत कमी तीन लिटर एवढं पाणी प्यायलाच हवं. त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात सलाडचा समावेश देखील तुम्ही करायला हवा. त्यामुळे तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन फायबर हे मिळेल, असं अलका कर्णिक यांनी सांगितलं.

advertisement

गर्भवती असताना महिलेला लागली ती वाईट सवय, ऑपरेशन केल्यावर डॉक्टरांनाही विश्वास बसेना! नेमकं काय घडलं?

तुमच्या आहारामध्ये सर्व चटण्यांचा समावेश असायला हवा. त्यासोबतच आहारामध्ये तुम्ही काकडीचा किंवा पत्ता गोबीचा देखील समावेश करू शकता. हा जो रायता आहे तो तुम्ही जेवणाच्या 15 मिनिटांत खायला हवा. त्यासोबतच तुमच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचा समावेश देखील असायला हवा. तुमच्या आहारामध्ये प्रोटीन फायबर्स याचं प्रमाण हे असायलाच हवं. त्यासोबतच तुमचा कडधान्याचा समावेश पाहिजे. तसेच तुम्ही नाचणीचा देखील तुमच्या आहारात समावेश करून घेऊ शकता. नाचणी तुम्ही विविध माध्यमातून घेऊ शकता, असं अलका कर्णिक यांनी सांगितलं.

advertisement

लहान मुलांकडे दुर्लक्ष करू नका! सतत मोबाईल पाहणं ठरू शकतं धोकादायक

त्यासोबतच आहारमध्ये तुपाचा देखील समावेश हा करायला हवा. डायट घेताना तुम्ही व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. या पद्धतीने जर तुम्ही डायट घेतला तर तुमचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. यामुळे तुम्हाला हेल्दी राहायला मदत होईल, असंही अलका कर्णिक अलका कर्णिक यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
वजन कमी करायचंय? असा फॉलो करा आहार, नक्की होईल फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल