वर्धा, 28 डिसेंबर : उज्जायी प्राणायामाचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत. थायरॉइड आणि गळ्यासंदर्भातले सर्व आजार या प्राणायामामुळे आपण दूर ठेऊ शकतो. हा प्राणायाम करताना अनेकदा चुका होतात. त्यामुळे उज्जायी प्राणायामाची योग्य पद्धत अणि फायदे याविषयी आपल्या वर्धा येथील योगा मार्गदर्शक दामोदर राऊत यांनी माहिती दिली आहे.
advertisement
कसा करावा उज्जायी प्राणायाम?
सर्वप्रथम गळा आकुंचित करून गळ्यातून आतून घोरण्यासारखा आवाज येतो. त्यानंतर हनुवटी छातीला लावण्याचा प्रयत्न करून शक्य तितका वेळ श्वास रोखून ठेवायचा आहे. त्यांनतर हळू हळू मान वर करून उजवी नासिका बंद करून डाव्या नासिकेने श्वास सोडायचा आहे, असं दामोदर राऊत सांगतात.
हृदयरोग अन् किडनी स्टोनही होईल गायब, रोज करा हा प्राणायाम
काय आहेत फायदे?
उज्जायी प्राणायामाचे आपल्या आरोग्यासाठी अनन्यसाधारण फायदे आहेत. आजकाल महिलांमध्ये थायरॉईडच्या समस्या जास्त दिसून येत आहेत. त्यामुळे महिलांनी हा प्राणायाम केल्यास थायरॉईड दूर ठेवता येऊ शकतो. तसेच सर्वांनी हा प्राणायाम केल्यास गळ्यासंदर्भातील सर्व आजार आपल्यापासून दूर राहण्यास मदत होईल, असं दामोदर राऊत सांगतात.
सर्दी, खोकलाच नाहीतर हृदयरोगही होईल गायब, हा प्राणायाम करून तर पाहा
दररोज हा प्राणायाम तीन ते पाच वेळा करावा. नियमितपणे उज्जायी प्राणायामाचा सराव करणार्या व्यक्तीवर वयाचा परिणाम दीर्घकाळपर्यंत होत नाही. थायरॉईडच्या रूग्णांसाठी हा प्राणायाम उपयुक्त आहे. या प्राणायामाच्या सरावाने मानेमध्ये असणार्या पॅरा-थायरॉईडस निरोगी राहतात. मेंदूला आराम पोहोचवतो. उज्जायी प्राणायामाचा नियमित सराव केल्यास पचनशक्ती वाढते. घशातील कफ दूर होऊन फुफ्फुसांचे आजार रोखण्यास मदत होते. हृदय रूग्णांसाठी हा उपयुक्त प्राणायाम आहे. यामुळे घोरण्याची समस्या दूर होण्यास मदत होते, असंही दामोदर राऊत यांनी सांगितलं.





