वाढतं वजन, आणि बाहेर आलेल्या पोटामुळे आत्मविश्वासही कमी होतो. तंदुरुस्त राहायचं असेल सकाळपासून रात्रीपर्यंत तुमच्या सवयी काय आहेत याचाही थेट परिणाम तब्येतीवर होतो. या सोप्या 5 सवयी व्यवस्थित पाळल्या तर पोटावरची चरबी हळूहळू कमी होईल.
Mosquitoes : डासांना पळवण्यासाठी कांदा, लसूण, लवंगांचा करा वापर, डास होतील गायब
1. सकाळी कोमट पाणी प्या.
advertisement
सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून रिकाम्या पोटी पिणं खूप फायदेशीर आहे. यामुळे चयापचयाचा वेग वाढतो आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत होऊ शकते. त्यात मधही घालू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी याची मदत होते.
2. योगासनं आणि व्यायाम करा.
सकाळी 20-30 मिनिटं योगासनं किंवा व्यायाम करणं हा पोटाची चरबी कमी करण्याचा सर्वात परिणामकारक मार्ग आहे. सूर्यनमस्कार, कपालभाती यांसारखी आसनं पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. योगाऐवजी व्यायाम करण्याला प्राधान्य देत असाल तर तुमच्या दिनचर्येत कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश करा.
Face Mask : सुरकुत्या कमी करण्यासाठी सोपा उपाय, त्वचा दीर्घकाळ राहिल तरुण
3. संतुलित नाश्ता
नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्वाचा आहार आहे. त्यात प्रथिनं, फायबर आणि कमी-कॅलरी असलेले पोषक घटक असणं गरजेचं आहे. अशा पदार्थांमुळे, पोट जास्त काळ भरलेलं राहील.
4. व्यायाम
तब्येतीसाठी फक्त सकाळचा व्यायाम पुरेसा नाही. रोज सक्रिय राहणंही महत्त्वाचं आहे. तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर दर तासाला तुमच्या खुर्चीवरून उठून थोडं फिरा. लिफ्टच्या ऐवजी पायऱ्या वापरा आणि तुमच्या संध्याकाळच्या नित्यक्रमात 20 मिनिटं चाला.
5. रात्री हलका आहार घ्या, लवकर जेवा
रात्रीचं जेवण लवकर आणि हलकं करणं खूप महत्वाचं आहे. झोप आणि रात्रीच्या जेवणात 2-3 तास आधी रात्रीचं जेवण होईल अशी वेळ ठरवा. सूप, कोशिंबीर तसंच हाय फायबर आणि प्रथिनयुक्त अन्नाचा यात समावेश करा. रात्री जड अन्न खाल्ल्यानं चरबी वाढण्याची शक्यता वाढते.
या गोष्टी लक्षात ठेवा:
एका रात्रीत किंवा लगेच पोटावरची चरबी कमी करणं शक्य नाही. यासाठी शिस्त, संयम पाळणं आवश्यक आहे. या 5 सवयी व्यवस्थित पाळल्या तर पोटावरची चरबी कमी होईल आणि तुमच्या शरीरात सकारात्मक बदल जाणवतील.