उन्हाळ्यात घामाचा वास कमी करण्यासाठी आणि शरीराला ताजेपणा राखण्यासाठी अनेक सुपरफूड्स प्रभावी ठरतात. जीवाणूंशी लढून, शरीराचं तापमान योग्य राखणं आणि उन्हाळ्यात नैसर्गिकरित्या ताजंतवानं राहण्यासाठी यामुळे मदत होते. म्हणूनच हल्ली अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्प्रे न वापरता फ्रेश वाटावं यासाठी प्रयत्न करतात.
Nose Bleeding : नाकातून रक्त का येतं ? एपिटक्सिस म्हणजे काय ? जाणून घ्या
advertisement
उन्हाळ्यात घामाच्या वासापासून मुक्तता कशी मिळवायची?
डॉक्टरांच्या मते, उन्हाळ्यात घाम येणं स्वाभाविक आहे. काही सुपरफूड्स खाल्ल्यानं उन्हाळ्यात घामाचा वास कमी होऊ शकतो. आहारतज्ज्ञांच्या मते,
- मेथीचे दाणे काही तास पाण्यात ठेवून खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात आणि घामाचा वास दूर होतो.
- कलिंगड आणि काकडी खाल्ल्यानं शरीरातील अनावश्यक गोष्टी लघवीसोबत बाहेर जाण्यास मदत होते, यामुळे घामाचा वास कमी होतो.
- सायट्रिक एसिड असलेली फळं म्हणजेच संत्री आणि लिंबू, हे खाल्ल्यानंही घामाचा वास कमी होतो.
Climate Anxiety : बदलत्या ऋतूमधे तब्येतीला जपा, शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष नको
- ही फळं नियमितपणे खाल्ल्यानं उन्हाळ्यात घाम कमी होतो, दुर्गंधी दूर होते आणि शरीर जास्त काळ फ्रेश वाटतं.
- याशिवाय हिरव्या भाज्या, पालेभाज्या खाल्ल्यानं घामाचा वास दूर होण्यास मदत होते.
घामाच्या वासापासून मुक्त होण्यासाठी काय टाळावे?
वर नमूद केलेले सुपरफूड्स खाणं आणि काही अन्नपदार्थ टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात लाल मांस, कांदा, लसूण आणि अल्कोहोलचं सेवन शक्य तितकं टाळावं. यामधे असलेल्या सल्फरमुळे घामाचा वास वाढू शकतो. तसंच, धूम्रपान करण्याची सवयही शरीराच्या वासाच्या बाबतीत हानिकारक असू शकते.
