Climate Anxiety : बदलत्या ऋतूमधे तब्येतीला जपा, शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष नको
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
काही दिवसांपूर्वी पडलेला धोधो पाऊस पाहून मान्सून सुरु झाला असं वाटत असतानाच परत ऊन असं वातावरण आहे. उन्हाळा फक्त तापमान वाढवत नाही तर त्याचा मन आणि शरीरावरही परिणाम होतो. काहींना यामुळे ताण जाणवतो. अशा हवेत तुम्हालाही अस्वस्थ वाटत असेल, तणाव जाणवत असेल, डिहायट्रेड, अशक्त वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.
मुंबई : काही वेळ पाऊस, परत कडक ऊन अशा दमट हवेत खूप गरम होतं. काही दिवसांपूर्वी पडलेला धोधो पाऊस पाहून मान्सून सुरु झाला असं वाटत असतानाच परत ऊन असं वातावरण आहे. उन्हाळा फक्त तापमान वाढवत नाही तर त्याचा मन आणि शरीरावरही परिणाम होतो. काहींना यामुळे ताण जाणवतो. अशा हवेत तुम्हालाही अस्वस्थ वाटत असेल, तणाव जाणवत असेल, डिहायट्रेटेड, अशक्त वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.
प्रत्येक ऋतू आपल्यासोबत काही नवीन समस्या घेऊन येतो. उन्हाळ्यात अनेकांना अशक्त वाटतं. ज्यांचं मन आधीच अस्वस्थ असतं त्यांची अस्वस्थता वाढू शकते. असं का घडतं ? समजून घेऊ.
उन्हाळा, ऋतू बदल आणि शरीराचं समायोजन
आपलं शरीर प्रत्येक ऋतूनुसार स्वतःला जुळवून घेतं, पण तापमान अचानक वाढतं तेव्हा शरीरात अनेक प्रकारचे बदल होतात. त्याचा पहिला परिणाम आपल्या शरीराच्या तापमानावर होतो. बाहेरची उष्णता वाढली की, शरीराचं संतुलन बिघडतं. त्याचा परिणाम आपल्या मेंदू, हृदय आणि इतर अवयवांवरही होतो.
advertisement
हृदय आणि रक्तदाबावर परिणाम
उन्हाळ्यात, हृदयाला शरीर थंड ठेवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. याचा अर्थ हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तदाबात चढ-उतार होऊ लागतात. हृदयाचे ठोके वाढतात तेव्हा ते कधीकधी वेगानं श्वास घेणं, हातपाय थंड होणं किंवा किंचित अस्वस्थ वाटणं यासारखी लक्षणं दिसतात.
advertisement
मेंदूवर परिणाम
उष्णतेमुळे झोपेचा त्रास होतो, जो मानसिक स्थितीसाठी सर्वात मोठा धोका बनतो. झोप पूर्ण होत नाही तेव्हा चिडचीड, भीती वाटणं आणि मूड अचानक बदलणं असे बदल होतात. यासोबतच, मनात चालू असलेल्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम देखील शरीरात खोलवर होतो. उन्हाळ्यात विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होते आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते.
advertisement
रोगप्रतिकारक शक्ती आणि आजारांचा धोका
उन्हाळ्यात शरीराची संरक्षण प्रणाली थोडी कमकुवत होते. त्यामुळे पोटदुखी, अन्नातून विषबाधा किंवा त्वचेशी संबंधित समस्या जाणवतात. शरीर वारंवार आजारी पडतं तेव्हा मनही अस्वस्थ होतं आणि त्यामुळे चिंता आणखी वाढते.
सर्वात जास्त कोणाला त्रास होतो ?
लहान मुलं, वृद्ध आणि आधीच काही आजारानं ग्रस्त असलेल्यांना उष्णतेचा सर्वात जास्त त्रास होताे. त्यांच्या शरीराचं तापमान लवकर बिघडतं आणि त्यांचं मनही लवकर अस्थिर होतं. एखाद्याला आधीच चिंता किंवा चिंतेची तक्रार असेल तर उष्णतेमुळे हा त्रास आणखी वाढतो.
advertisement
भरपूर पाणी प्या: शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा थकवा येणं आणि चक्कर येणं असे प्रकार घडतात.
थंड आणि हलके पदार्थ खा: ताजी फळं, सॅलड आणि लिंबू पाणी पिणं फायदेशीर आहे.
पुरेशी झोप घ्या: दिवसभराचा थकवा आणि उष्णतेमुळे, रात्रीची चांगली झोप घेणं महत्वाचं आहे.
advertisement
उन्हापासून दूर राहा: विशेषतः जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा दुपारी बाहेर जाणं टाळा.
मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा: ध्यान, प्राणायाम किंवा चालणं यामुळे तुमचं मन शांत करण्यास मदत करू होते.
यानंतरही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. वेळेवर सल्ला घेतल्यानं शरीरावरचा आणि मानसिक आरोग्यावरचा ताण कमी होण्यासाठी मदत होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 04, 2025 8:18 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Climate Anxiety : बदलत्या ऋतूमधे तब्येतीला जपा, शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष नको










