Heart Attack : Silent Killer हृदयविकाराची लक्षणं, महिलांनी जरुर लक्षात ठेवा या गोष्टी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
हृदयविकाराच्या आधी शरीर काही संकेत देत असतं. त्यामुळे शरीर देत असलेले छोटे संकेत लक्षात ठेवा आणि प्रत्येक अदृश्य संकेतही गांभीर्यानं घ्या. कारण हे संकेत वेळेवर ओळखणं ही सर्वात मोठी संरक्षण पायरी आहे.
मुंबई : Silent Killer असलेल्या हृदयविकाराचं प्रमाण वाढतंय. हृदयविकाराविषयी वाचतो तेव्हा छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास होणं असं ऐकून असतो. पण हृदयविकाराची लक्षणं, विशेषतः महिलांमधे, पूर्णपणे वेगळी असतात आणि कधीकधी इतकी सौम्य असतात की ती ओळखणंही कठीण होतं.
हृदयविकाराच्या आधी शरीर काही संकेत देत असतं. त्यामुळे शरीर देत असलेले छोटे संकेत लक्षात ठेवा आणि प्रत्येक अदृश्य संकेतही गांभीर्यानं घ्या. कारण हे संकेत वेळेवर ओळखणं ही सर्वात मोठी संरक्षण पायरी आहे. महिलांमधे हृदयविकाराची लक्षणं वेगवेगळी का असतात, कोणती चिन्हं दिसतात आणि त्याकडे त्वरित लक्ष देणं का महत्त्वाचं आहे समजून घेऊ.
advertisement
महिलांमधे हृदयविकाराची लक्षणं वेगळी का असतात?
पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीराची रचना आणि कार्यपद्धती खूप वेगळी असते. त्यांच्या हृदयाच्या धमन्यांमधे अडथळा कधीकधी मुख्य नसांमधे नसून खूप पातळ नसांमध्ये होतो. याला मायक्रोव्हस्क्युलर डिसीज - Microvascular Disease म्हणतात. या लहान नसांमध्ये अडथळा येतो तेव्हा लक्षणं वेगवेगळी असू शकतात. याशिवाय, महिलांमधे इस्ट्रोजेन सारखे हार्मोन्स, शरीरात जाणवणारी जळजळ यामुळे देखील हृदयविकाराच्या लक्षणांवर परिणाम होतो.
advertisement
ही सामान्य लक्षणं कायम दुर्लक्षित केली जातात -
महिलांमधे हृदयविकाराचा झटका नेहमीच छातीत दुखण्यानं सुरू होईल असं नाही. कधीकधी छातीत कोणतीही अस्वस्थता जाणवत नाही. खालील लक्षणं अनेकदा दिसून येतात, पण अनेकदा हे नेहमी होतं असं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
लक्षणं -
-पोटात बिघाड किंवा मळमळ जाणवणं.
-जबड्यात दुखणं
-पाठीत किंवा दोन्ही हातांमधे विचित्र अस्वस्थता वाटणं.
advertisement
-छातीत दुखत नसलं तरीही श्वास घेण्यास त्रास होणं.
-घाम येणं, थोडी चक्कर येणं किंवा खूप थकवा येणं.
-रात्री अस्वस्थता जाणवणं, भीती वाटणं किंवा झोप सलग न लागणं.
-ही लक्षणं किरकोळ मानून, अनेक महिला वेळेवर डॉक्टरांशी संपर्क साधत नाहीत, ज्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते.
advertisement
"सायलेंट हार्ट अटॅक" -
काही महिलांना हृदयविकाराचा झटका येतो पण त्यांना कोणतीही मोठी लक्षणं दिसत नाहीत. याला सायलेंट इस्केमिया म्हणतात, ज्यात हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो पण वेदना किंवा कोणतंही स्पष्ट लक्षण दिसत नाही. ही स्थिती धोकादायक आहे कारण ती ओळखणं खूप कठीण आहे.
काय करावं ?
- महिलेला वर नमूद केलेली कोणतीही लक्षणं आढळली तर उशीर करू नका. ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा, ईसीजी आणि इतर आवश्यक चाचण्या करा.
advertisement
- लक्षात ठेवा, लवकर निदान झालं तर उपचार वेळेत होतात. शरीराची हानी तुलनेनं कमी होते.
- महिलांनी आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे, यासाठी नियमित तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि तणाव व्यवस्थापनानं हृदय दीर्घकाळ निरोगी राहू शकतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 03, 2025 6:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Heart Attack : Silent Killer हृदयविकाराची लक्षणं, महिलांनी जरुर लक्षात ठेवा या गोष्टी











