कशी घ्यावी केसांची काळजी?
आपण जर नॉनव्हेज खात असाल तर ते आपल्या केसांसाठी देखील चांगला असतं. तर सर्वप्रथम आपण एक अंड घ्यायचं. त्या अंड्यामधला पिवळा गर बाजूला काढून जो पांढरा गर असतो तो आपण मेहंदीमध्ये मिक्स करून आपल्या केसांना जर लावला तर आपले केस छान सिल्की होतात. त्याचबरोबर कोंडा होत नाही आणि केस गळती सुद्धा कमी होते. हा घरगुती उपाय आपण करू शकतो, अशी माहिती दर्शना देशमुख सांगतात.
advertisement
तीळ खा अन् रोगमुक्त व्हा, हिवाळ्यातील फायदे माहितीये का?
त्याच बरोबर विटामिन ईची गोळी घ्यायची ती गोळी आणि एलोवेरा जेल हे एकत्र करून हे मिश्रण जर आपण आपल्या केसांना लावलं तर आपले केस आहे छान सिल्की होतात आणि वाढ देखील व्हायला मदत होते. तुम्ही तुमच्या केसांसाठी घरगुती तेल सुद्धा तयार करू शकता तर हे तेल तयार करण्यासाठी एक कांदा घ्यायचा काळे तीळ, थोडे मेथीचे दाणे आणि कोणतेही तेल जे तुम्ही वापरत असाल ते. हे सगळं मिश्रण तेला मध्ये टाकायचं आणि हे गॅस वरती तेल लाल होईपर्यंत उकळून घ्यायचं. नंतर ते गाळून घ्यायचं. दर दोन दिवसाला हे तेल लावून केसांची छान मालिश करून घ्यायची आणि त्यानंतर केस धुतले तर तुमचे केस एकदम सुंदर आणि छान होतात, असं दर्शना देशमुख सांगतात.
हिवाळ्यात सांधेदुखीवर रामबाण इलाज; एक पदार्थ खा, सर्व दुखणी होतील दूर
दही हे सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तर ते दही आपण जर आपल्या केसांना लावलं आणि त्यानंतर तुम्ही केस धुतले तर तुमचे केस हे छान होतात. वाढ देखील व्हायला मदत होते. हे सर्व घरगुती उपाय जर तुम्ही ट्राय केले तर तुमचे केस चांगले व्हायला आणि वाढायला मदत होईल, असंही दर्शना देशमुख सांगतात.