शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि विविध जीवनसत्त्वांची कमतरता हेही टाचांना भेगा जाण्याचं प्रमुख कारण मानलं जातं.
हिवाळा किंवा थंडीचं आगमन होत असताना अनेकांच्या टाचांना भेगा जातात. अनेकदा तर काहींना पुन्हा पुन्हा हा त्रास होतो. काहींना ऋतू बदलला की हा त्रास होतो पण काहींना इतर ऋतूंमध्येही टाचेची तक्रार जाणवते. बहुतेकांना थंडीच्या हंगामात त्रास होतो, यामध्ये पायाचे तळवे आणि टाच कोरडे, कडक होतात. टाचांमध्ये किंचित भेगा पडू लागतात. कधीकधी या भेगांमध्ये वेदना, खाज सुटणं आणि रक्तस्त्राव देखील सुरू होतो.
advertisement
Turmeric Face Pack - चेहऱ्यासाठी हळदीचे खास फेसपॅक, मुरुमांचे डागही होतील कमी
थंड हवामानात टाचांना भेगा जाण्याची कारणं काय आहेत?
टाचांना भेगा पडल्यानं चालताना त्रास होतो. थंडीमध्ये टाचेवर भेगा येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्वचा कोरडी पडणं. याशिवाय थंडीमुळे शरीरात होणारे हार्मोनल बदल आणि विविध जीवनसत्त्वांची कमतरता हेही टाचांना भेगा जाण्याचं प्रमुख कारण मानलं जातं. हिवाळ्यात, अनेकदा घोट्याची पुरेशी काळजी घेतली जात नाही. चेहरा आणि शरीराच्या इतर भागांची काळजी घेतली जाते तशी पायांची काळजी घेतली जात नाही त्यामुळेही टाचांना भेगा जातात.
Post Diwali Diet Tips : दिवाळीच्या सुट्टीत वजन वाढलं, या पेयांनी करा वजन कमी..
टाचेला भेगा जाण्याची अन्य कारणं कोणती ?
बुरशीजन्य संसर्ग, जीवनशैली, त्वचेशी संबंधित आजार, मधुमेह आणि थायरॉईड वाढल्यामुळेही टाचांना तडे जातात. अनेक वेळा बूट आणि मोजे चांगले नसतील तरीही टाचांमध्ये भेगा होतात. थंड वातावरणात मॉईश्चरायझरच्या कमतरतेमुळेही टाचांना भेगा पडतात. टाचांना भेगा पडण्याची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळते.
भेगा पडलेल्या टाचांसाठी घरगुती उपाय काय आहेत ?
भेगा पडलेल्या टाचांवर घरगुती उपायांनी उपचार करता येतात. टाचांमध्ये भेगा प्रामुख्यानं कोरड्या त्वचेमुळे होतात. त्यामुळे, त्वचा पूर्ववत होण्यासाठी, टाचांच्या भेगांमध्ये आणि आजूबाजूला पुरेसा ओलावा ( हायड्रेशन ) मिळावा यासाठी हील बाम किंवा मॉइश्चरायझर लावणं फार महत्वाचं आहे.
टाच स्वच्छ, मॉइश्चरायझ्ड ठेवा आणि सूती मोजे घाला
विशेषतः, दररोज आंघोळीनंतर, ओलावा टिकवून ठेवण्यासाठी टाचांना मॉइश्चरायज केल्यानंतर सूती मोजे घालावेत. भेगा भरण्यासाठी देशी तूप, वनस्पती तेल, ग्लिसरीन, गुलाबपाणी, एरंडेल, खोबरेल तेल, मध, मेण आणि कापूर इत्यादींचा वापर केला जातो. आणखी एक उपाय म्हणून, टाचांच्या भेगा, आजूबाजूची कडक, कोरडी आणि जाड त्वचा बरी करण्यासाठी, सुमारे 20 मिनिटं कोमट पाण्यात पाय भिजवून ठेवावेत. त्यासाठी एक्सफोलिएटिंग साधनं म्हणजे प्युमिस स्टोन किंवा फूट फाईलनं हलक्या हातानं स्क्रब करा. त्यानंतर, टॉवेलनं पाय कोरडे करा आणि मॉइश्चरायझर लावा आणि सूती मोजे घाला.
भेगा पडलेल्या टाचांसाठी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला कधी घ्यावा?
ज्यांना त्वचारोग आहे त्यांच्यासाठी पावलात चांगले, स्वच्छ, सुती मोजे वापरणं कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. तसंच योग्य आकाराचे बूट, चांगले सुती मोजे, स्वच्छ चप्पल, अति थंड आणि अति उष्ण हवामान टाळणं,
नियमित मॉइश्चरायझर आणि शरीराला हायड्रेट ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मधुमेह, बुरशीजन्य संसर्ग
किंवा कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.