हेल्दी खा दातांचा त्रास टाळा
दात दुखणे ही समस्या उद्भवल्यास होत असलेला त्रास भयंकर स्वरुपाचा असतो. त्यामुळे हा त्रास टाळायचा असेल तर हेल्दी फूड खाणे महत्वाचे आहे. डॉक्टरांनी संगीलेली फळं चावून खाल्यास दात स्वच्छ आणि हिरड्याही मजबूत राहतील. दातांच्या दुखण्यावर लवकर अराम हवा असेल तर त्रास कमी असतानाच डॉक्टरांना दाखवणे महत्वाचं आहे. दातांना नेहमी करिता मजबूत आणि स्वच्छ ठेवायचं असेल तर डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी पाळणे देखील आवश्यक आहे.
advertisement
वयाच्या 96 पर्यंत कधीही आजारी पडले नाहीत; काय आहे आजोबांच्या हेल्थचा सिक्रेट फंडा?
कोणतं फळं खाण्याचा सल्ला?
दातांमध्ये किड लागणे किंवा दात खराब होणे ही समस्या गंभीर होऊ शकते. हा त्रास टाळायचा असेल तर गाजर, मुळा, सफरचंद, बिट अशाप्रकारचे फळ चावून चावून खाणे गरजेचे आहे. त्यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी तसेच मजबूत राहण्यास मदत होते, असे डेंटिस्ट सांगतात. कोणत्याही वयातील व्यक्तींनी आपले दात स्वच्छ ठेवायचे असल्यास हेल्दी फळ खाणं महत्त्वाचं आहे. तसेच अन्न खाताना चावून खावं तसेच फास्ट फूड किंवा अनहेल्दी फूड खाऊ नये ते टाळावे, असा सल्ला देखील डॉक्टर देतात.





