TRENDING:

Winter Diet : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवाल ? सुका मेवा, गुळाचा करा आहारात समावेश

Last Updated:

हिवाळा सगळ्यांनाच सहन होतो असं नाही, काहींची प्रतिकारशक्ती कमी होते. सर्दी-खोकला होतो, अशावेळी आहारात आवश्यक बदल करणं आणि प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं गरजेचं असतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्याच्या काही भागात हिवाळ्याची सुरुवात झाली आहे. थंडीचं आगमन होताच अनेकांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीचा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत, हिवाळ्याच्या हंगामात आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. पाहूया या दिवसात कोणते पदार्थ फायदेशीर ठरतील.
News18
News18
advertisement

हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अनेकदा कमकुवत होते. अशा परिस्थितीत सर्दी, अंगदुखी, ताप अशा तक्रारी वाढतात. या दिवसात सर्दी होणं हे सामान्य असलं तरी ही समस्या दीर्घकाळ राहिली तर त्रास वाढू शकतो. हिवाळ्यात या समस्या टाळण्यासाठी, प्रतिकारशक्ती मजबूत असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हिवाळ्याच्या ऋतूत आपण आपल्या आहारात सकस पदार्थांचा समावेश करणं आणि घरी हलकासा व्यायाम किंवा योगासनं करून आपलं शरीर निरोगी ठेवणं महत्त्वाचं आहे. यामुळे शरीर नेहमी तंदुरुस्त राहील.

advertisement

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी हिवाळ्यात काय खावं -

1. सुका मेवा -

हिवाळ्यात सुका मेवा खाल्ल्यानं शरीराला पुरेशा प्रमाणात ऊर्जा मिळते. याशिवाय सुका मेवा गरम असतो, त्यामुळे हिवाळ्यात सुका मेवा खाल्ल्यानं शरीर उबदार राहतं. या ऋतूमध्ये सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही बदाम, मनुका, शेंगदाणे, काजू आणि अक्रोड खाऊ शकता तसेच अंजीर आणि खजूरही खाऊ शकता, ते शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल.

advertisement

Heels Cracks - हिवाळ्यात टाचांना भेगा का जातात ? भेगा टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत ?

2. तीळ खा -

हिवाळ्यात तीळ खाणं खूप फायदेशीर आहे. तिळामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, प्रोटीन

आणि इतर पोषक घटक असतात. तीळ खाल्ल्यानं शरीराला रोगांशी लढण्यासाठी ऊर्जा मिळते आणि पचनक्रिया मजबूत होते. थंडीत तीळ खाल्ल्यानं शरीर आतून उबदार राहतं.

advertisement

Turmeric Face Pack - चेहऱ्यासाठी हळदीचे खास फेसपॅक, मुरुमांचे डागही होतील कमी

3. गूळ -

गुळाचं सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. गुळाचा गुणधर्म उष्ण तापमानाचा असतो, त्यामुळे हिवाळ्यात गूळ खाल्ल्यानं शरीर उबदार राहतं आणि थंडीपासून संरक्षण होतं. गूळ नुसता खाऊ शकतो किंवा गुळाचा चहा, गुळाचे लाडू बनवूनही खाता येतात.

advertisement

4. खजूर -

हिवाळ्यात खजूर खाणं खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर जीवनसत्त्वं मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या सेवनानं थंडीचा प्रभाव कमी होतो. हिवाळ्यात तुमच्या आहारात नियमितपणे खजूर समाविष्ट करून तुम्ही तुमचं शरीर उबदार ठेवू शकता.

5. हिरव्या भाज्या-

प्रत्येक ऋतूमध्ये हिरव्या भाज्यांचं सेवन करणं फायदेशीर असतं. हिरव्या भाज्या खाल्ल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते. हिवाळ्यात अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या बाजारात उपलब्ध असतात. तुम्ही पालक, मेथी, मोहरी, चाकवत खाऊ शकता. हिवाळ्यात हिरव्या भाज्यांचा आहारात प्रामुख्यानं समावेश करा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Winter Diet : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवाल ? सुका मेवा, गुळाचा करा आहारात समावेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल