रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी काय खावं हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो. त्यासाठी पुढे दिलेले दहा उपाय त्यासाठी नक्की करुन पाहा.
1.निरोगी, सकस आहार -
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल, तर तुम्हाला फास्ट फूड सोडावं लागेल आणि तुमच्या आहारात सकस, पूरक अन्नाचा समावेश करावा लागेल. अन्नातील व्हिटॅमिन सीचं प्रमाण वाढवावं लागेल. पौष्टिक आहार न घेतल्यानं रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. आहारात पुरेशी जीवनसत्त्वं आणि खनिजं असणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आलं, आवळा, तुळस, लसूण आणि पुदिना देखील खाऊ शकता.
advertisement
Joints Pain : सांधेदुखीवर हे उपाय नक्की करा, हिवाळ्यात तब्येतीकडे जास्त लक्ष द्या
2.पुरेसं पाणी प्या -
पाण्यामुळे शरीरातील 100 आजार बरे होतात असं म्हटलं जातं. रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी शरीरात पुरेसं पाणी देखील आवश्यक आहे. पाण्यामुळे पचन आणि पेशींचं कार्य सुधारतं. त्यामुळे दिवसभरात पुरेसं पाणी प्या.
3.पुरेशी झोप घ्या -
दिवसभर थकव्यानंतर शरीराला विश्रांतीची गरज असते. झोपेत असताना आपला मेंदू वेगानं काम करतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी गाढ आणि पुरेशी झोप घ्या. कमी झोप घेतल्यानं मेंदूचा ताण वाढतो.
4.धूम्रपान सोडा आणि अल्कोहोल टाळा -
धूम्रपान आणि मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. धूम्रपानामुळे फुफ्फुसाचं मोठं नुकसान होतं आणि शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होते. अल्कोहोलमुळे शरीरातील जळजळ वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते.
5.व्यायाम करा-
दररोज थोडा व्यायाम केला शरीर सक्रिय होण्यास मदत होते. त्यामुळे व्यायाम नक्की करा. यामध्ये दोरीवरच्या उड्या, नृत्य यांसारख्या व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व्यायामामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
Cashews : रोज किती काजू खावेत ? फायदे - तोटे समजून घ्या, मगच ठरवा काजूचं प्रमाण
6. तणाव
तणावामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर सर्वात वाईट परिणाम होतो. त्यामुळे निरुपयोगी गोष्टींवरील ताण कमी करा आणि स्वतःला कामात व्यस्त ठेवा. तणावाचा झोपेवरही वाईट परिणाम होतो आणि यामुळे पाणी कमी प्यायलं जातं.
7. शरीराचं वजन नियंत्रित ठेवा
शरीराच्या वाढत्या वजनाचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो, त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवरही दिसून येतो. त्यामुळे तुमच्या शरीराचे वजन नियंत्रित ठेवा आणि शारीरिक हालचालींसोबतच सकस अन्न खाण्याची सवय लावा.
8. योगासनं करा
योगासनं केल्यानं आपल्या शरीरातील अनेक आजार दूर होतात. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग हा सर्वोत्तम व्यायाम आहे. अनेक योगासनं आहेत, जी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचं काम करतात. कपालभाती आणि भ्रामरी यांसारखी योगासने फुफ्फुसांना मजबूत करतात आणि त्यांना संक्रमण आणि रोग टाळण्याची क्षमता देतात. योगामुळे तणावही दूर होतो.
9. सकारात्मक विचार करा
नकारात्मक विचार केल्यानं तणाव वाढतो. तणाव वाढल्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागावर त्याचा वाईट परिणाम होतो, ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती सर्वात जास्त प्रभावित होते. म्हणून, निराशावादी होण्याऐवजी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा आणि आशावादी व्हा. त्यामुळे नेहमी हसत राहा.