रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ
- फळे : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संत्रे, लिंबू, मोसंबी यासारखी साइट्रस फळे अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरात पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वाढते आणि रोगप्रतिकारशक्तीला बळकटी मिळते.
- आलं : आलं नैसर्गिक जंतुनाशक आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. सर्दी-खोकल्याच्या लक्षणांवर आराम मिळवण्यासाठी आलं उपयुक्त ठरते. हे चहात घालून किंवा कच्चे खाऊन घेता येते. यामुळे घश्याची खवखव कमी होते आणि प्रतिकारशक्तीला बळकटी मिळते.
- हळद : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद अत्यंत प्रभावी मानली जाते. हळदीमध्ये 'कर्क्युमिन' हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते. रात्री हळदीचे दूध घेतल्याने शरीरातील दाह कमी होतो आणि रोगांपासून संरक्षण मिळते.
- दही : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दहीही उपयुक्त ठरते. दहीमध्ये 'प्रोबायोटिक्स' असतात, जे आपल्या आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. हिवाळ्यातही दही खाणे फायद्याचे असते.
- हिरव्या पालेभाज्या : पालक यासारख्या हिरव्या पालेभाज्या प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सहाय्यक ठरतात. त्यात व्हिटॅमिन A, C, E आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. या भाज्या शरीराला ऊर्जा देतात आणि रोगप्रतिकारक शक्तीला बळकटी देतात.
advertisement
advertisement
हिवाळ्यात आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. साइट्रस फळे, आलं, हळद, दही आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यास प्रतिकारशक्तीला बळकटी मिळू शकते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2024 4:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही 5 पदार्थ खा, ताप-सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय, जाणून घ्या आणखी फायदे