पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात वाढत असलेली गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) च्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात याचे 100 हून अधिक रुग्ण आढळले असून 17 हून अधिक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर एका रुग्णाचा यात मृत्यू झालाय. हा आजार दिवसेंदिवस गंभीर वळण घेत असला तरी काही घाबरण्याचे कारण नाही, असेही आरोग्य विभागाकडून सांगितलं जातंय. मात्र हा आजार संसर्गजन्य आहे का? नेमका हा कोणाला होऊ शकतो? याविषयीची माहिती पुण्यातील डॉ. सचिन पवार यांनी दिली आहे.
advertisement
कोणाला होऊ शकतो आजार?
जीबीएस हा आजार एक ऑटो इम्यून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामध्ये इम्युनिटी सिस्टीम कमजोर होते आणि पेरिफेरल सिस्टमवर अटॅक होऊन रुग्णांना हातापायाला मुंग्या, अशक्तपणा, पॅरालीसीस अशा प्रकारची लक्षणे ही रुग्णांमध्ये पाहिला मिळतात. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा कोणालाही होऊ शकतो. काही संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल त्यामध्ये फ्लू किंवा covid 19 प्रकारची इन्फेक्शन पाहिला मिळत.
मुलगा अपघातात गेला, वडिलांनी ठरवलं! मागील 10 वर्षांमध्ये बुझवले 1500 खड्डे, एका बापाची कहाणी
ज्या रुग्णांनी कुठलीही लस घेतली असेल तर जीबीएसचा धोका हा उद्भवू शकतो. परंतु हे क्वचित रुग्णांमध्ये पाहिला मिळत. त्याचप्रमाणे कुठलीही मोठी सर्जरी किंवा दुखापत झाली असेल तर इथेही जीबीएसचा धोका हा पाहिला मिळतो. तसेच वयोवृद्ध नागरिक आणि ज्यांची इम्युनिटी ताकद कमी झाली असेल त्यांना देखील हा धोका उद्भवू शकतो, असं डॉ. सचिन पवार सांगतात.
हातापायाला मुंग्या येणे, मसल्स विकनेस असणे, पॅरालीसीसची लक्षणे दिसणे ही लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात. जीबीएस हा संसर्गातून पसरतो परंतु व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल यांच्यामध्ये जीबीएसचा धोका पाहिला मिळतो. आपल्याला रेस्पीरेटरी इन्फेक्शन होऊ नये यासाठी वारंवार हात स्वच्छ धुणे, चेहरा आणि डोळ्याला सारखा हात न लावणे, तसेच पाणी उकळून पिणे, अन्न चांगल्या पद्धतीने शिजवून खाणे, कच्च किंवा शीळ अन्न खाल्ल्यामुळेही जीबीएसचा धोका रुग्णांमध्ये पाहिला मिळतो.
हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही. इन्फेक्शन जीबीएसचे असेल त्यामध्ये काही कॅन्टॅमिनेशन झालं असेल तर जीबीएस हा होऊ शकतो. जीबीएस हा संसर्गजन्य आजार नसून एका जीबीएस झालेल्या रुग्णामुळे दुसऱ्याला हा होत नाही, अशी माहिती डॉ. सचिन पवार यांनी दिली आहे.