वारंवार गरम करून चहा प्यायल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? वारंवार गरम करून चहा पिण्याचे काय तोटे आहेत? आरोग्यासाठी चहा कसा प्यावा? अपोलोमेडिक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लखनऊच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ प्रीती पांडे News18 ला याबद्दल माहिती दिली आहे. ती पुढीलप्रमाणे...
तज्ज्ञांच्या मते, भारतातील बहुतेक लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. पण, बऱ्याच वेळा चहा बनवण्याचा कंटाळा येतो, त्यामुळे आपण एकाच वेळी जास्त चहा बनवतो आणि वेळोवेळी तो गरम करून पितो. पण, असं करणं आरोग्यासाठी चांगलं नाही. या सवयीमुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
advertisement
वारंवार गरम करून चहा पिण्याचे तोटे
चवीत बदल : आहारतज्ज्ञ प्रीती पांडे सांगतात की, वारंवार गरम करून चहा प्यायल्याने त्याची चव बदलते म्हणजेच तो खराब होतो. यासोबतच त्याचा सुगंधही नाहीसा होतो. या दोन्ही गोष्टी चहाची खासियत आहेत. याशिवाय, चहा पुन्हा गरम केल्याने त्याचे पोषक तत्वही कमी होतात.
आरोग्याला हानी : बराच वेळ आधी बनवलेला चहा गरम करून पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. चहामध्ये सूक्ष्मजंतूंची वाढ होऊ लागते. हे सौम्य बॅक्टेरिया आरोग्यासाठी हानिकारक असतात. खरं तर, घरी दूध चहा बनवताना दुधाचं प्रमाण जास्त असतं. यामुळे सूक्ष्मजंतूंच्या वाढीचा धोका वाढतो.
पोटदुखी : तज्ज्ञांच्या मते, हर्बल चहा वारंवार गरम केल्याने त्याची पोषक तत्व पूर्णपणे नष्ट होतात. तसेच, असा चहा प्यायल्याने पोटदुखी होऊ शकते. अशा स्थितीत पोट खराब होणे, पोट दुखणे आणि जळजळ अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.
निरोगी राहण्यासाठी असा चहा प्या : चहा बनवल्यानंतर 15 मिनिटांनी तो गरम केल्यास शरीराला जास्त नुकसान होत नाही. यापेक्षा जास्त वेळ हानिकारक असू शकतो. त्यामुळे, जेवढा चहा तुम्ही त्या वेळेत पिऊ शकता तेवढाच चहा नेहमी बनवा.
हे ही वाचा : कमी जेवल्याने, उपाशी राहिल्याने वजन कमी होतं ? करू नका ही चूक, जाणून घ्या आहारतज्ज्ञांचा सल्ला
हे ही वाचा : Say No to Sugar : वजन कमी करण्यासाठी पथ्य पाळा, हे पदार्थ खाणं टाळा