कोल्हापूर : भारताने जगाला दिलेली महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे योग. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा याबरोबरच योग साधनेला देखील अनन्य साधारण महत्त्व आहे. योग आणि योगसाधनेबाबत त्यांच्या अनेक फायद्याबवाबत समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठीच आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. याच योग दिवसाचे औचित्य साधून कोल्हापूरच्या एका जवळपास चार दशक जुन्या असलेल्या योगा संस्थेकडून मोफत सूर्यनमस्कार आणि ओंकार धारणा वर्ग आयोजित करण्यात आले आहेत.
advertisement
कोल्हापूरची योग विद्याधाम ही संस्था 1984 सालापासून गेली जवळपास चाळीस वर्षे योग्य पध्दतीने योग शिकवण्याचे कार्य करत आहे. या संस्थेमुळे हजाराहून अधिक योग शिक्षक तयार झाले आहे. त्यातच या संस्थेने आता आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सूर्यनमस्कार आणि ओंकार धारणा वर्ग आयोजित केले आहेत. सलग सात दिवस रोज एक तास अशा पद्धतीने हे योगवर्ग कोल्हापुरातील विविध ठिकाणी या संस्थेमार्फत मोफत घेतले जाणार आहेत. असे योगा मार्गदर्शिका अनुष्का पाटील यांनी सांगितले आहे.
लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिनं हाती घेतलं रिक्षाचं स्टेअरिंग, सोलापूरकर लय भारी!
सलग सात दिवस घेतले जाणार हे योग वर्ग
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वकाळात 14 जूनपासून ते 20 जूनपर्यंत कोल्हापूर शहरातील विविध आठ ठिकाणी हे योगवर्ग राबविण्यात येणार आहेत. या योगवर्गामध्ये सहभागी होणाऱ्यांना योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार कसे घालावेत याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच यावेळी ओंकाराची धारणा शिकायला खूप चांगली संधी उपलब्ध होणार आहे, असेही अनुष्का पाटील यांनी सांगितले आहे.
कुठे आणि कधी असणार हे योगवर्ग?
कोल्हापुरातील वेगवेगळ्या आठ ठिकाणी हे योग वर्ग घेण्यात येणार आहेत त्यामध्ये लक्ष्मीपुरी येथील धान्य व्यापारी प्रेरित बाल कल्याण संस्था, गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत हॉल, राजारामपुरी 13 वी गल्ली कोरगावकर हॉल, उजळाईवाडीतील हनुमान नगर येथील योगभवन तसेच शिवाजी विद्यापीठ रोडवरील सन्मित्र हाउसिंग सोसायटी हॉल या ठिकाणी सकाळी 6 ते 7 या वेळेत योगवर्ग घेतले जातील. मंगळवार पेठेतील क्रेयॉन्स इंटरनॅशनल स्कूल आणि मोतीबाग तालीम नजीकच्या कोल्हापूर चित्पावन संघ हॉलवर सकाळी 7 ते 8 या वेळेत योगवर्ग घेतले जातील. तसेच राजारामपुरी 11 वी गल्लीतील सिद्धी विनायक प्लाझा या ठिकाणी सकाळी 6 ते 7 आणि सायंकाळी 4 ते 5 या वेळेत योगवर्ग पार पडतील अशी माहिती देखील अनुष्का यांनी दिली आहे.
कोणतंही प्रशिक्षण नाही, पण कलेला तोडच नाही! धाराशिवच्या लेकीचा विदेशात डंका
काडसिद्धेश्वर महाराज यांचे योगपर मार्गदर्शन
दरम्यान जागतिक योग दिनाच्या दिवशी सकाळी ठीक 5.30 ते 6.30 यावेळेत योग भवन उजळाईवाडी येथे कणेरी मठ सिद्धगिरी संस्थानचे परमपूज्य श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांचे योगपर मार्गदर्शन आणि व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे. तर योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व योगवर्ग घेतले जाणार असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील अनुष्का पाटील यांनी केले आहे.
पुण्यातील कलाकारानं शोधली पार्किन्सन्स आजारावर डान्स थेरपी!
संपर्क : योग विद्याधाम, कोल्हापूर, राजारामपुरी 13 वी गल्ली, कोल्हापूर
संपर्क : (रोहित गवळी) +91 96579 63475