लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिनं हाती घेतलं रिक्षाचं स्टेअरिंग, सोलापूरकर लय भारी!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
अनेक महिला त्यांचा मोबाईल नंबर घेऊन आवडीनं त्यांच्या रिक्षातून प्रवास करतात. त्यांना हा प्रवास सुरक्षित वाटतो.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : घरचा आर्थिक गाडा चालवण्यासाठी काही वर्षांपूर्वी महिलांनी रस्त्यावर उतरून पुरुषांच्या जोडीला रिक्षा चालवायला सुरुवात केली. पूर्वी कुठेतरी 1-2 महिला रिक्षाचालक पाहायला मिळायच्या. आता मात्र अनेक महिला मोठ्या हिंमतीनं रिक्षा चालवतात. शोभा घंटे या सोलापुरातील पहिल्या महिला रिक्षाचालक. 2 ऑक्टोबर 2018पासून त्या सोलापुरात रिक्षाचालक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्या नुसती हौस म्हणून रिक्षा चालवत नाहीत, तर त्यांनी ड्रायव्हिंगचं रितसर प्रशिक्षण घेतलंय.
advertisement
शोभा घंटे यांनी एका खासगी ड्रायव्हिंग स्कूलमधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर एका बँकेतून कर्ज घेऊन त्यांनी रिक्षा खरेदी केली आणि जोमानं आपलं काम सुरू केलं. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या माऊलीनं रिक्षाचं स्टेअरिंग हाती घेतलं.
advertisement
विशेष म्हणजे शोभा घंटे यांना पोलीस व्हायचं हवं. पोलीस भरतीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र उंचीमुळे त्यांचं हे स्वप्न साकार होऊ शकलं नाही. परंतु रिक्षाचालक म्हणून त्यांनी शेवटी खाकी गणवेश परिधान केलाच.
तसंच पोलीस होऊन समाजसेवा करता आली नाही, परंतु आता प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचं काम हे समाजसेवेपेक्षा काही कमी नाहीये. आज अनेक महिला शोभा घंटे यांचा मोबाईल नंबर घेऊन आवडीनं त्यांच्या रिक्षातून प्रवास करतात. त्यांना हा प्रवास सुरक्षित वाटतो.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 11, 2024 6:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिनं हाती घेतलं रिक्षाचं स्टेअरिंग, सोलापूरकर लय भारी!