कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असलेली फळं रक्तातील साखर हळूहळू वाढवतात, ज्यामुळे मधुमेहींसाठी ही फळं सुरक्षित पर्याय आहेत. काही फळांमुळे रक्तातली साखर वेगानं वाढते. त्यामुळे मधुमेहींनी जीआय खूप कमी असणारी फळं खाण्याचा सल्ला दिला जातो.
Summer Care : पायांची जळजळ होईल कमी, उन्हाळ्यात हे उपाय नक्की करा
मधुमेही रुग्णांसाठी 5 आरोग्यदायी फळं -
advertisement
1. सफरचंद
सफरचंद हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स (सुमारे 36) असलेलं फळ आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सफरचंद फायदेशीर आहे. यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, यामुळे पचन सुधारतं आणि रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मदत होते.
2. जांभूळ
जांभूळ हे उन्हाळ्यात हमखास मिळणारं फळ. जांभळाचा जीआय अंदाजे 25 असतो. रक्तातील साखर नियंत्रित करणं तसंच यातले अँटीऑक्सिडंट्स पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करतात.
3. संत्र
व्हिटॅमिन सी असलेल्या संत्र्याचा GI सुमारे 40 आहे. संत्र्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि उन्हाळ्यात यामुळे उत्साही वाटतं.
Summer Drink : उन्हाच्या तलखीतून वाचण्यासाठी हे पर्यायही लक्षात ठेवा, पारंपरिक उपायांचा होईल उपयोग
4. नाशपती / पेर
नाशपातीचा जीआय सुमारे 38 असतो आणि त्यात भरपूर फायबर असतं, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. उन्हाळ्यात हा एक चविष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे.
5. पपई
पपईचा जीआय सुमारे 60 असतो. मधुमेहींसाठीही पपई सुरक्षित आहे. पपईमुळे पचन सुधारतं आणि शरीराला थंडावा मिळतो.
मधुमेही रुग्णांसाठी महत्त्वाच्या टिप्स
कोणतंही फळ मर्यादित प्रमाणात खा.
खूप गोड किंवा साखरयुक्त फळं टाळा.
फळं खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.