TRENDING:

महाशिवरात्रीला उपवास करताय तर ही चूक करू नका! डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

शरीराला ऊर्जा देण्यासाठी उपवास अतिशय महत्त्वाचा असतो. महाशिवरात्रीचा उपवास असेल तर हा उपवास कसा करावा? काय खावे किंवा खाऊ नये? याबद्दच डॉक्टर गणेश जाधव यांनी माहिती सांगितली आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी 
advertisement

पुणे : भारतीय संस्कृतीमध्ये उपवासाला विशेष महत्त्व असून अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं म्हंटल आहे. जसा निसर्गाला बदल अनिवार्य आहे तसाच शरीराला पण बदल हवा असतो. शरीराला ऊर्जा देण्यासाठी उपवास अतिशय महत्त्वाचा असतो. उपवासाचा अर्थ म्हणजे हलका वा मित आहार घेणे. उपवास म्हणजे दैनंदिन आहार वर्ज्य करून शरीर शुद्धी करण्याचा एक नैसर्गिक उपाय आहे. आषाढी एकादशी, महाशिवरात्र, रामनवमी, हरतालिका, श्रावण महिना, नवरात्र अशा व्रतांमध्ये उपवासाचे स्थान महत्त्वाचे आहे. महाशिवरात्रीचा उपवास असेल तर हा उपवास कसा करावा? काय खावे किंवा खाऊ नये? याबद्दच डॉक्टर गणेश जाधव यांनी माहिती सांगितली आहे. 

advertisement

उपवास म्हणजे उप आणि वास म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला कसं उपाशी राहता येईल ही यामागची संकल्पना असते. आता जर आपण पाहिलं तर उपवास असेल तर अनेक वेळा लोक भरपूर आहार हा घेत असतात. परंतु आयुर्वेदिक नुसार असं सांगितलं जातं की तुम्ही फक्त आणि फक्त पाण्यावर राहा. परंतु ज्या लोकांना पाण्यावर उपवास शक्य नाही अशा लोकांनी भगर आणि रताळे हे उत्तम उपाय आहेत, असं डॉक्टर गणेश जाधव यांनी सांगितलं आहे. 

advertisement

Mahashivratri Recipe: फक्त 5 मिनिटांत बनवा साबुदाणा खीर, महाशिवरात्रीच्या उपवासाला खास रेसिपी

भगरीमध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस मुबलक असतं, त्यामुळे भगर पचायला अतिशय हलकी असते. वजन कमी होण्यास मदत होते, हाडांना मजबुती मिळते, ऊर्जेची पातळी वाढते, मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी भगर हे एक परिपूर्ण अन्न आहे. दही, ताक, भगर, रताळे आणि फळं यांचा आहारात समावेश असावा.

advertisement

उपवासाच्या दिवशी खूप खाणं किंवा अजिबात न खाणं या टोकाच्या गोष्टी टाळाव्यात. खिचडी, तळलेले पदार्थ हे शरीरासाठी अतिशय घातक असून फळ आहार, कंदमुळे, रताळे, फळांचा ज्यूस हे घेऊ शकतो. निरंकार उपवास करताना 12 ते 16 तास करावा परंतु 24 तास निरंकार उपवास केल्याने थकवा जाणवू शकतो. त्यामुळे शक्यतो 24 तास निरंकार उपवास करणे टाळावे, अशी माहितीही डॉक्टर गणेश जाधव यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
महाशिवरात्रीला उपवास करताय तर ही चूक करू नका! डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल