सगळ्यात पहिले तर ज्या देखील व्यक्तीला मानसिक आजार असतो हा व्यक्ती वेडा नाही. यामागे विविध अशी कारणे असू शकतात. सगळ्यात पहिले म्हणजे कामाचा ताण त्यासोबत डिप्रेशन किंवा इतरही गोष्टी यामध्ये असतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार होऊ शकतो आणि याच्यावरती चांगला इलाज देखील आहे. 70 टक्के रुग्ण हे या मानसिक आजारातून बरे होत असतात. त्यांना फक्त कौन्सिलिंगची आवश्यकता असते, असं डॉक्टर रश्मिन आंचलिया यांनी सांगितलं आहे.
advertisement
Matcha Tea Benefits: शरीरात राहणार नाहीत विषारी घटक, कधी पिलाय का माचा टी? Video
मानसिक आजार झाला म्हणजे तुम्हाला कुठली भूतबाधा झाली असे नसते. त्यामुळे आपण आपल्या डोक्यातून हा गैरसमज काढून टाकायला हवा की याचा काहीतरी दोष असेल, देवाचा काहीतरी शाप असेल किंवा इतरही कुठल्या गोष्टी असतील. तर असं एखादा व्यक्ती मानसिकरित्या आजारी असेल तर आपण त्याला सगळ्यात पहिले हा भावनिक त्यासोबत मानसिक आधार देणं गरजेचं असतं जेणेकरून तो व्यक्ती लवकर हा बरा होईल. त्यामुळे आपल्या डोक्यात जे पण काही वाईट गैरसमज असतील ते आपण काढून टाकायला हवेत, असं असं डॉक्टर रश्मिन आंचलिया यांनी सांगितलं आहे.
एखादा व्यक्तीला मानसिक आजार झाला असेल किंवा एखादा डिप्रेशनमध्ये जात असेल तर त्याला सगळ्यात पहिले तुम्ही चांगल्या डॉक्टरांकडे दाखवलं पाहिजे. त्यांचं कौन्सलिंग केलं पाहिजे आणि जर त्यांना योग्य तो इलाज दिला तर हा व्यक्ती परत समाजामध्ये चांगला वागू शकतो. आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत तो नीट पार पाडू शकेल, असंही डॉक्टर रश्मिन आंचलिया यांनी सांगितलं आहे.