वाढत्या वयाबरोबर त्वचेवर सुरकुत्या पडणं सामान्य आहे. त्याचा परिणाम विशेषतः चेहऱ्यावर अधिक दिसून येतो. वयानुसार, त्वचेतील कोलेजनचं प्रमाण कमी होऊ लागतं आणि त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी होऊ लागतो, ज्यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. हे टाळण्यासाठी, अँटी-एजिंग क्रीम आणि लोशनचा वापर केला जातो. पण अनेकवेळा याचा वापर करुन यश येत नाही.
advertisement
पण घरगुती उपायांमुळे त्वचा तरुण दिसतेच तसंच त्वचेला पोषण देखील मिळतं. ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. चला जाणून घेऊया नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने असे काही घरगुती उपाय जे तुमच्या त्वचेला म्हातारपणातही सुरकुत्या आणि बारीक रेषा टाळण्यास मदत करतील.
कोरफड -
कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई समृद्ध, कोरफड त्वचेला पुरेशी आर्द्रता पुरवते आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होतात. कोरफडीचा गर काढून चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ तसाच राहू द्या आणि नंतर चेहरा स्वच्छ करा.
Facial : घरीच करा गोल्डन फेशियल, सात दिवसांचं ब्युटी रुटीन फॉलो करा, चेहऱ्यावर येईल चमक
गुलाब पाणी आणि ग्लिसरीन
गुलाबपाणी वापरल्यामुळे त्वचेला टोन मिळतो आणि ग्लिसरीनमुळे त्वचेला आर्द्रता मिळते. रोज गुलाबपाणी आणि ग्लिसरीन लावल्यानं सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होते. यासाठी पाण्यात दोन थेंब ग्लिसरीन मिसळा आणि रोज झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा.
केळी आणि मध
केळ्यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मधामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. पिकलेले केळं कुस्करा आणि त्यात मध घालून स्वच्छ चेहऱ्यावर लावा.
नारळ तेल
खोबरेल तेलामुळे त्वचेचं खोलवर पोषण होतं. झोपण्यापूर्वी त्वचेवर खोबरेल तेल लावल्यानं सुरकुत्या कमी होतात. यासाठी सेंद्रिय खोबरेल तेल किंचित गरम करून लावणं अधिक फायदेशीर ठरु शकतं. या उपायानं त्वचा मुलायम आणि तरुण राहण्यास मदत होईल.
Vitamin E : कोरड्या, निर्जीव केसांवर रामबाण उपाय, व्हिटॅमिन ईचा मास्क वापरा, केस दिसतील मुलायम, दाट
हळद आणि दही
हळद आणि दही दोन्ही घटक त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हळदीतील अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करतात तर दही खोलवर स्वच्छतेसाठी उपयुक्त आहे. दोन चमचे ताज्या दह्यात एक चमचा हळद मिसळून पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यावर लावा.
बदाम तेल
बदामाच्या तेलात आढळणारं व्हिटॅमिन ई त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई त्वचेतील कोलेजन राखण्यासाठी उपयुक्त आहे. झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलानं चेहऱ्याचा मसाज केल्यास सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर राहण्यास खूप मदत होते.
मध किंवा लिंबू
मध आणि लिंबामुळे त्वचेचं पोषण होतं. अर्धा चमचा लिंबाचा रस एक चमचा मधात मिसळून चेहऱ्याला लावा आणि काही वेळानं स्वच्छ करा. हे सर्व उपाय महागड्या त्वचेच्या उत्पादनांपेक्षा अधिक परिणामकारक ठरु शकतील. वयानुसार तुमच्या त्वचेला सुरकुत्या आणि बारीक रेषांपासून दीर्घकाळ संरक्षण देण्यासाठी प्रभावी ठरतील.