शरीरातील अशुद्धता काढून टाकणं, रक्त शुद्ध करण्यासाठी आणि पचन आणि चयापचय चांगलं राखण्यासाठी आपल्या शरीरातलं यकृत हे वरदान मानलं जातं. कारलं, हळद, लसूण आणि आवळा यांसारख्या देशी पदार्थांत अँटिऑक्सिडंट्स, दाहक-विरोधी गुणधर्म आणि आवश्यक पोषक घटक असतात ज्यामुळे यकृताचं कार्य सुधारतं, विषारी पदार्थ बाहेर काढले जातात आणि यकृताच्या पेशी पुन्हा निर्माण करण्यास मदत करतात.
advertisement
या पदार्थांमुळे पित्ताचं उत्पादन वाढतं, चरबी जमा होण्याचं प्रमाण यामुळे कमी होतं आणि ऑक्सिडेटिव्ह ताणाशी लढण्याची यामुळे ताकद मिळते. यकृताच्या आरोग्यासाठी हे पदार्थ खूप महत्वाचे आहेत. संतुलित जीवनशैलीसह हे देशी पदार्थ यकृतासाठी नैसर्गिक टॉनिक म्हणून काम करू शकतात आणि चांगलं कार्य करण्यास मदत करू शकतात.
1. आवळा
आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण भरपूर आहे. विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि यकृताच्या पेशी पुन्हा निर्माण करण्यासाठी यामुळे मदत होते. आवळ्यानं यकृताचं कार्य सुधारतं आणि यकृताला आलेली सूज आणि ऑक्सिडेटिव्ह ताण टाळता येतो. कच्चा आवळा, आवळ्याचा रस किंवा वाळलेल्या आवळ्याची कँडी खाण्यानं यकृताचं नैसर्गिकरित्या चांगलं डिटॉक्सिफिकेशन होऊ शकतं.
Hair Care : केसांसाठी घरगुती जेलचा पर्याय, तांदूळ - जवस करतील जादू
2. हळद
हळदीतील सक्रिय संयुग, करक्यूमिन, यकृताची सूज कमी करण्यासाठी आणि यकृतात चरबी जमा होण्यास प्रतिबंध करण्यासाठी ओळखली जाते. यामुळे पित्त उत्पादनास मदत होते. कोमट पाण्यात किंवा दुधात चिमूटभर हळद मिसळून प्यायल्यानं यकृत नैसर्गिकरित्या स्वच्छ होतं.
3. लसूण
लसणामुळे यकृतातील एंजाइम सक्रिय होतात. विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी याची मदत होते. त्यात सल्फर संयुग आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असतं. यामुळे यकृताचं कार्य सुधारतं आणि फॅटी लिव्हरची समस्या कमी करता येते. दररोज अन्न शिजवताना एक किंवा दोन लसूण पाकळ्या टाकल्यानं यकृताच्या आरोग्याला खूप फायदा होतो.
4. कारलं
कारलं यकृत स्वच्छ करण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी उपयुक्त आहे. यात पित्त प्रवाह सुधारणारे आणि यकृतातील चरबी कमी करणारे घटक असतात. कारल्यामुळे यकृतातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते आणि यकृताचं काम मंदावण्यास प्रतिबंध होतो.
5. बीट
बीटातील बीटालेन्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे यकृताची सूज आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत होते. उकडलेलं बीट किंवा बीटाच्या रसाच लिंबू पिळून पिणं हा यकृतासाठी एक उत्तम पर्याय आहे.
6. कोथिंबीर
कोथिंबीरीमुळे यकृतातील जड धातू आणि हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढून नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत होते. तसंच रात्रभर भिजवून ठेवलेले धणे नियमितपणे खाणं यकृत स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरतं आणि पचनासाठी मदत होते.
7. पपई
पपई पचन सुधारून आणि यकृतावरील भार कमी करून यकृताच्या आरोग्यासाठी मदत करते. पपेन आणि किमोपापेन या एंझाइम्समुळे सूज कमी होते आणि शरीर स्वच्छ करण्यास मदत होते. पिकलेली पपई पोटासाठी हलकी असते आणि नैसर्गिक यकृत बूस्टर म्हणून प्रभावी असते.