सासू-सुनेच्या नात्यात विस्तव जात नाही म्हणतात. सासू-सुनेच्या भांडणावर वाहिन्यांच्या मालिकांना टीआरपी मिळतो. मुंबईच्या कांदिवलीत राहणारी अमिषा जिची प्रकृती दिवसेंदिवस बिघड होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नोव्हेंबर 2022 मध्ये किडनीच्या समस्येचं निदान झालं. तपासणीत तिच्या दोन्ही किडनी खराब झल्याचं समजलं. तिच्या कुटुंबाला धक्काच बसला. डॉक्टरांनी तिला किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. तिच्या पतीला डायबेटिज असल्याने तो किडनी देऊ शकत नव्हता.
advertisement
सासूनं सुनेला दिला नवा जन्म
अमिषा जीवनमृत्यूशी झुंज देत होती. ती मृत्यूच्या दारात होती. तिला असं पाहून तिच्या सासूचाही जीव तडफडत होता. अखेर तिने एक निर्णय घेतला. 70 वर्षांच्या या सासूने आपल्या सुनेला किडनी द्यायचं ठरवलं. अनेकांनी त्यांना समजावलं पण त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही. त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. 1 ऑगस्ट 2023 रोजी नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आली.
तुमचं हृदय मोलाचं आहे, एकदा कोलेस्टेरॉल चेक करा, डॉक्टरांचं म्हणणं नीट ऐका Video
सासूचं फुलांनी स्वागत
सासूला गेल्या शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. घरी पोहोचल्यावर मोठ्या सुनेने सासूचं फुलांनी स्वागत केलं. प्रभा म्हणाल्या, ‘मी अमिषाला किडनी दान करू शकले, याचा मला खूप आनंद आहे. माझ्या सुनेचा जीव वाचला, यापेक्षा महत्त्वाचं काय असू शकतं. प्रत्येकाने अवयव दान करावे असे देखील आवाहन त्यांनी केले.