तुमचं हृदय मोलाचं आहे, एकदा कोलेस्टेरॉल चेक करा, डॉक्टरांचं म्हणणं नीट ऐका Video

Last Updated:

शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी या गोष्टी करा. बघा डॉक्टरांनी काय दिल्या टिप्स..

+
तुमचं

तुमचं हृदय मोलाचं आहे, एकदा कोलेस्टेरॉल चेक करा, डॉक्टरांचं म्हणणं नीट ऐका Video

नागपूर, 10 ऑगस्ट: निरोगी पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल आवश्यक असते. मात्र, शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढलेले असणे हे मोठ्या धोक्याचे लक्षण ठरू शकते. जर शरीरात खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर ते रक्तातील रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते. त्यामुळे हृदय आणि मेंदूला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. त्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. याबाबत नागपूरमधील डॉ. श्रुती आखरे यांनी माहिती दिली आहे.
कोलेस्टेरॉल म्हणजे नक्की काय ?
कोलेस्टेरॉल हा आपल्या रक्तात आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, परंतु जेव्हा त्याचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते, तेव्हा ते हानिकारक ठरू लागते. शरीरात चांगले कोलेस्टेरॉल, वाईट कोलेस्टेरॉल आणि एकूण कोलेस्टेरॉल असते. चांगल्या कोलेस्टेरॉलला हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) आणि खराब कोलेस्टेरॉलला लो डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) म्हणतात. वास्तविक, कोलेस्टेरॉल हा लिपोप्रोटीन नावाचा चरबीचा प्रकार आहे. लिपोप्रोटीनचे दोन प्रकार आहेत कमी घनता लिपोप्रोटीन (LDL) आणि उच्च घनता लिपोप्रोटीन (HDL). शरीरात HDL चे प्रमाण वाढणे चांगले मानले जाते, तर दुसरीकडे, LDL चे प्रमाण वाढणे आपल्या शरीरासाठी खूप वाईट मानले जाते.
advertisement
ही असतात लक्षणे
कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यावर आपल्या छातीत मुख्यता डाव्या बाजूला दुखणे, अति थकवा येणे, चक्कर येणे हातापायाला मुंग्या येणे असे बरेच प्रकार आढळून येतात. या लक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास बीपीचा त्रास किंवा बीपी आजाराशी संबंधित हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेज, पॅरालिसिस, असे आजार देखील उद्भवत असतात. कोलेस्टेरॉल वाढण्यास आपले दैनंदिन धकाधकीचे जीवन, जीवनशैली, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या पद्धती, अपुरा सकस आहार ही काही मुख्य कारणे आहेत. यामधून आपल्या शरीरात हळूहळू कॅलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत जाते आणि ठराविक वेळेनंतर त्याची लक्षणे दिसून येतात. त्यावर उपचार केल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रणात देखील आणू शकतो, अशी माहिती डॉ. आखारे यांनी दिली.
advertisement
कोलेस्टेरॉल मुक्तीसाठी खास टिप्स
दैनंदीन जीवनातील आहारात फायबर, प्रोटीन्स, प्रथिने, हिरवा पालेभाज्या आदी सकस आहाराचा समावेश करावा. जंक फूड, फास्ट फूड इत्यादी सारख्या खाद्य पदार्थांचे सेवन प्रमाणात करावे. जेणेकरून आपण निरोगी राहू शकता. धूम्रपान, मद्यपान इत्यादी सारखे व्यसनाचे मानवी आरोग्यावर फार विपरीत परिणाम होत असतात. त्यावर नियंत्रण असणे गरजेच आहे. दैनंदिन जीवनातील आपल्या वेळेचे व्यवस्थापन ही देखील शरीरासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे.
advertisement
आहार, पाण्याची काळजी घ्या
सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवणाची, न्याहरीची वेळ ठरवून त्या नुसार आपण ती वेळ पाळली पाहिजे. रात्रीची झोप हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. किमान 6-7 तास रात्रीची झोप मानवी शरीराला गरजेची असते. पाणी हे अनेक आजारांचे कारण ठरत असते. मात्र दिवसाला किती पाणी प्यावे याची काळजी घेतली पाहिजे. जसे की प्रति व्यक्ती 20 किलो वजनासाठी 1 लिटर तर 40 किलो वजनासाठी 2 लिटर पाणी हे प्रमाण आवश्यक आहे. तणाव रहित आयुष्य जगणे, रोज योगा व्यायाम, मेडीटेशन इत्यादी गोष्टीचे पालन केल्यास कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आपण नियंत्रणात आणू शकतो, अशी माहिती डॉ. आखारे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
तुमचं हृदय मोलाचं आहे, एकदा कोलेस्टेरॉल चेक करा, डॉक्टरांचं म्हणणं नीट ऐका Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement