मूकबधीर व्यक्ती हाताने इशारा करणार अन् तो व्हाईस मेसेजने तुम्हाला कळणार, भन्नाट असं यंत्र

Last Updated:

ठाण्यातल्या विद्यार्थ्यांनी हे खास यंत्र तयार केलंय. या यंत्रामुळे एक मोठी अडचण दूर होणार आहे.

+
News18

News18

ठाणे, 10 ऑगस्ट :  अनेक वेळा रस्त्यानं जात असताना आपल्याला मुक बधीर लोक दिसून येतात. रस्ता चुकल्याने किंवा काही माहिती हवी आसल्यास ते आपल्याशी बोलण्याचा किंवा संवाद साधण्याचा प्रयत्न करतात.  ते ज्या भाषेत संवाद साधतात ती भाषा आपल्याला समजत नाही. त्यामुळे त्यांना मदत करणे अवघड जाते. आता त्यांनी केलेले हावभाव आपल्याला समजणार आहेत. ठाण्यातल्या विद्यार्थ्यांनी यासाठी एक खास यंत्र तयार केलंय.
ठाण्यातल्या ए. पी. शहा या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन साईनटोन हे यंत्र तयार केले आहे. हातमोज्यांचा वापर करून हे यंत्र तयार केलंय. मूकबधिरांचे हावभाव सर्वसामान्य नागरिकांना कळावेत, यासाठी त्यांनी नागरिकांच्या सांकेतिक भाषेचे रुपांतर शब्दात आणि आवाजात करणारे साईनटोन हे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र हातमोज्यांना जोडले असून, हे हातमोजे मूकबधिरांचे हावभाव ओळखून त्यांना नेमके काय म्हणायचे आहे असा मेसेज व व्हाईस नोट मोबाईलवर पाठवतात. त्यामुळे आता मूकबधिर लोकांशी संवाद साधणे सोपे झाले आहे.
advertisement
कशी झाली निर्मिती?
गेल्या वर्षी विद्यार्थ्यांनी एनएसएस कॅम्प दरम्यान मूकबधिर विद्यार्थ्यांच्या आश्रमाला भेट दिली होती.  त्यावेळी विद्यार्थ्यांनी  त्या मुलांशी संवाद साधण्याचा, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांची सांकेतिक भाषा आमच्या विद्यार्थ्यांना समजली नाही. त्यातून हे उपकरण तयार करण्याची संकल्पना त्यांना सुचली, अशी माहिती  प्राध्यापक अमोल शिंदे यांनी दिली.
advertisement
कापडी हातमोज्यांना एक यंत्र जोडले आहे. मूकबधिर मुलांचे हावभाव असलेला डाटा या यंत्रामध्ये साठवला आहे. हे हातमोजे मूकबधिर व्यक्तीने हातात घालायचे आहे. त्यातून त्या व्यक्तीने केलेले हावभाव एनकोड करून ती व्यक्ती काय बोलत आहे असा मेसेज किंवा व्हाईस नोट मोबाईलवर पाठवली जाणार आहे. उदाहरणार्थ हातमोजे घालून अंगठा दाखवला तर ऑल द बेस्ट असा मेसेज मोबाईलवर येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी मोबाईल ॲप देखील तयार करण्यात आलंय.
advertisement
ए. पी. शाह अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षातील साकेत सप्रे, राज फडतरे, प्रथम पारखे आणि प्रसाद मराठे या ठाण्यातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कौशल्याचा आणि बुद्धिमत्तेचा वापर करून 'साइनटोन' नावाचे उपकरण विकसित केले आहे असे शिंदे यांनी सांगितले.
advertisement
कसा साधणार संवाद?
या यंत्राच्या मदतीनं  मूक-बधिरांच्या सांकेतिक भाषेचे रूपांतर शब्दांमध्ये आणि व्हाईस नोटमध्ये होते. हे रुपांतर   मोबाईलच्या स्क्रीनवर दिसू शकते. त्यामुळे मूकबधिर व्यक्ती काय बोलत आहे त्यातील महत्त्वाचे शब्द स्क्रीनवर दिसत असल्याने त्यांच्या संवाद करता येतो.  हे उपकरण बनविण्यासाठी 8 ते 9 महिन्याचा कालावधी लागला असून यासाठी 6 हजार रूपयांचा खर्च आला आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
मूकबधीर व्यक्ती हाताने इशारा करणार अन् तो व्हाईस मेसेजने तुम्हाला कळणार, भन्नाट असं यंत्र
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement