advertisement

'या' रणरागिणी चालवतात पुणेकरांची मेट्रो, पाहा कसा झाला त्यांचा प्रवास Video

Last Updated:

पुणे मेट्रोनं प्रवास करण्याची सर्वात अभिमानास्पद गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

+
News18

News18

पुणे, 9 ऑगस्ट :  पुणे मेट्रोच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या विस्तारित प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी नुकतंच केलं.  . स्मार्ट स्टेशन, हलकी मेट्रो तसेच सुरक्षित व पर्यावरणास अनुकूल प्रवास अशी पुणे मेट्रोची महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. यासोबतच पुणे मेट्रोची आणखी एक बाब सर्वांसाठी अभिमानाची आहे.  पुणे मेट्रोचे सारथ्य तब्बल नऊ महिला करत आहेत. अनेक अडचणींवर मात करत या सर्वांनी इथपर्यंत मजल मारलीय. त्यांच्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशात पुणेकरांची मान उंचावलीय.
पुणे मेट्रोची लोकोपायलट असलेल्या अपूर्वा आलटकर या मूळच्या साताऱ्याच्या असून यापूर्वी त्यांनी भारत फोर्ज मध्ये नोकरी केलेली आहे.त्यांनी आपले इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण करून मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि पायलट म्हणून रुजू झाल्या.
advertisement
'मेट्रो चालवणे हा एक वेगळाच अनुभव आहे. आई वडिलांनासुद्धा खूप आनंद होत आहे. आपलं कौतुक होताना पाहून अभिमान वाटतोय. अनोळखी लोकांनी सुद्धा त्यांच्या व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून माझ्या कामाचं कौतुक केलेलं पाहून छान वाटलं. पुणे मेट्रो चालवणं ही एक महिला म्हणून माझ्यासाठी अभिमानाने मान उंचावणारी गोष्ट आहे,' अशी भावना अपूर्वानं व्यक्त केली.
advertisement
नाशिकच्या पल्लवी शेळकेचाही इथपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.  नांदूर शिंगोटे या छोट्याशा खेड्यापासून पुणे मेट्रोची पायलट अशी त्यांनी मजल मारली आहे. त्यांना ड्रायव्हींगची आवड होती. संगमनेर येथील इंजीनियरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मेट्रोच्या ड्रायव्हिंगसाठी अप्लाय केले.
advertisement
पहिल्यांदा मेट्रो चालवताना भीती होती. इतक्या प्रवाशांच्या जबाबदारीचं दडपण आलं होतं. पण, मी मेट्रो चालवताना पाहून आईला खूप आनंद झाला. माझ्याबद्दल सर्वजण अभिमानानं बोलतात, असं तिनं सांगितलं. त्यावेळी माझी छाती अभिमानानं भरुन आली, असं पल्लवीनं सांगितलं.
advertisement
कोणत्याही  गाडीच्या ड्रायव्हींगचा शून्य अनुभव असलेल्या शर्मीन आय्याज शेख यांनी आज मेट्रोचे स्टिअरींग हातात घेतलआहे. त्या पुण्यातील चाकणच्या रहिवाशी आहे. 'मेट्रो चालवताना सुरुवातीला भीती वाटली. इतक्या प्रवाशांना घेऊन मेट्रो चालवल्यानंतर स्वत:चा अभिमान वाटला,' असं शर्मीननं सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'या' रणरागिणी चालवतात पुणेकरांची मेट्रो, पाहा कसा झाला त्यांचा प्रवास Video
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement