जागतिक किर्तीचा खेळाडू विकतोय चहा, पाहा का आली अशी वेळ?

Last Updated:

देशाला आंतरराष्ट्रीय पदके मिळवून दिली, आता दिव्यांग खेळाडू रस्त्यावर चहा विकून गुजराण करतोय.

+
जागतिक

जागतिक किर्तीचा खेळाडू विकतोय चहा, पाहा का आली अशी वेळ?

नागपूर, 10 ऑगस्ट: दिव्यंगत्व आपल्या स्वप्नाच्या आड येऊ शकतं नाही याचं मूर्तिमंत उदाहरण नागपुरातील एका खेळाडूंनं घालून दिलंय. नियतीने जरी आपल्याशी खेळ खेळला असला तरी स्वतःच्या अंगी असलेल्या आत्मविश्वासाच्या ताकदीवर नागपूरचा तिरंदाज संदीप गवई यांनी स्वत:ला सिद्ध केलंय. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यानं 4 वेळा भारताचं प्रतिनिधित्व करताना देशासाठी पदकं जिंकली आहेत. मात्र, सरकारच्या खेळाडूंप्रती असलेल्या उदासीन वृत्तीमुळे या जागतिक किर्तीच्या खेळाडूवर चहा पोहे विकून आपला उदर निर्वाह करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
शिवछत्रपती पुरस्कारसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित
संदीप गवई हा पॅरा आर्चरी या क्रीडा प्रकारातील खेळाडू आहे. तो एका पायाने दिव्यांग असून त्याला पोलिओ झाला होता. त्यात तो 42% दिव्यांग आहे. गेल्या 14-15 वर्षापासून त्याने अनेक स्पर्धांमध्ये भारतचे प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये 18 हून अधिक पदके पटकावली आहेत. तसेच शासनाच्या वतीने दिला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारही संदीपला मिळाला आहे.
advertisement
शासन दरबारी उपेक्षा
2018 साली शासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या सामान्य व दिव्यांग खेळाडूंना नोकरी संदर्भात आश्वासन देण्यात आलं होतं. त्यासाठी खेळाडूंची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती. कागदा पत्रांची पडताळणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली होती. मात्र 2018 ते 2023 या पाच वर्षाच्या कालावधीत यात कुठलीही कारवाई झाली नाही. आम्ही वेळोवेळी शासन दरबारी त्याचा पाठपुरावा केला मात्र अद्याप त्यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. शासनाने आमच्यासारख्या दिव्यांग खेळाडूला प्रोत्साहन दिले तर देशासाठी काही तरी करून दाखवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी मदत होईल. संबंधित मंत्री महोदयांनी यात लक्ष घालावे, असे मत संदीपने बोलतांना व्यक्त केले
advertisement
म्हणून थाटला चहाचा व्यवसाय
माझ्या घरातील परिस्थिती नाजूक आहे. घरी माझी पत्नी दोन मुलं वयोवृद्ध वडील असा प्रपंच आहे. माझ्या खेळासाठी समाजातील अनेक संस्था व मान्यवरांनी मला सढळ हाताने मदत केली. आर्चरी हा क्रीडा प्रकार अतिशय महागडा असला तरी समाजातील लोकांच्या सहकार्यामुळे आणि माझ्यातील आत्मविश्वासामुळे मी या खेळात आपल्या देशासाठी काहीतरी करू शकलो याचा अतिशय आनंद आहे. मात्र घरची परिस्थिती आणि खेळ यातील डोलारा सांभाळणे हे माझ्या आवाक्या बाहेर आहे. शासन दरबारी कायम उपेक्षा मिळाल्याने अखेर परिस्थिती पुढे हतबल झालो. आता दारात चहा पोह्यांचा गाडा लावून माझा उदरनिर्वाह भागवत आहे, अशी माहिती संदीपने दिली.
advertisement
केवळ आश्वासनांची खैरात
माझी कैफियत मी वेळोवेळी अनेकांसमोर मांडली. मात्र मला अद्याप आश्वासन शिवाय दुसरे काही हाती लागले नाही. एकवेळ शासन माझ्या बाबतीत उदासीन असेलही मात्र, त्याहून कैकपट दुःख मला त्या गोष्टीचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना मी प्रशिक्षण देतो, त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांच्या मनात माझी अवस्था पाहून अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित करणारी माझी व्यथा आहे. ते पुढे हे क्रीडा क्षेत्र निवडताना विचार करतील. जर माझ्या सारख्या खेळाडूची ही अवस्था आहे तर इतरांच्या मनात एक नकारात्मक विचार पेरला जाईल. जो की माझ्या लेखी दुर्देवी आहे, असे मत संदीप याने बोलतांना व्यक्त केले.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
जागतिक किर्तीचा खेळाडू विकतोय चहा, पाहा का आली अशी वेळ?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement