फक्त 10 मिनिटांत मिळतो निकाल
डेली मेलच्या अहवालानुसार, ही चाचणी एका लाल दिव्यासारखी आहे. जसे रस्त्यावर लाल सिग्नल लागल्यावर वाहन थांबवावे लागते, त्याचप्रमाणे चाचणीत हानिकारक एन्झाईमची चिन्हे दिसल्यास, व्यक्तीला सावध राहण्याची गरज आहे. या चाचणीचा निकाल 10 मिनिटांत येतो. ही चाचणी केवळ हृदयविकारच नव्हे, तर मधुमेह आणि स्मृतिभ्रंश (Dementia) देखील शोधू शकते. दंतचिकित्सक डॉ. फजिला खान ओसबोर्न म्हणतात की, नवीन चाचणी एक प्रकारच्या अलार्म सिस्टीमसारखे काम करेल. त्या म्हणाल्या की आपल्या तोंडात करोडो बॅक्टेरिया (Bacteria) असतात. यापैकी अनेक तोंडाच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात, तर अनेक हृदयविकार आणि मधुमेहालाही जन्म देतात. यामुळे भविष्यातील रोगांबद्दलही आपल्याला माहिती मिळू शकते.
advertisement
हृदयविकार लवकर ओळखता येईल
ही चाचणी कोणत्याही रोगाची सुरुवातीच्या टप्प्यात ओळख करू शकते. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जर या चाचणीने भविष्यातील रोग शोधले, तर जगभरातील लोकांचे अब्जावधी रुपये वाचतील. तोंडाच्या रोगांवर ती एक रामबाण उपाय ठरेल. डॉ. जमीला खान म्हणाल्या की, आपले तोंड हे बहुतेक रोगांचे पहिले प्रवेशद्वार आहे. शरीरात कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता असल्यास, ते तोंडातील बॅक्टेरियावरूनही समजू शकते. त्यामुळे नियमित दंत तपासणी करावी. त्या म्हणाल्या की तोंडातून लाळेद्वारे हृदयविकार लवकर ओळखला गेला, तर यापेक्षा चांगले काहीच असू शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरात दरवर्षी 1.79 कोटी लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो. या दृष्टीने ही चाचणी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते.
हे ही वाचा : चहा वारंवार गरम करून पिणे योग्य आहे का? तज्ज्ञांनी सांगितले हे धक्कादायक तोटे, आरोग्य चांगलं हवं असेल, तर...
हे ही वाचा : सतत पोटदुखीची समस्या निर्माण होते? तर हे 5 पदार्थ तुमच्या पोटात करताहेत गडबड, डाॅक्टरांनी सांगितलं...