Curd : रोज एक वाटी दही खाण्याचं महत्त्व, पोटासह संपूर्ण उपयुक्त
या मिश्रणानं तुमच्या चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारेल आणि चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशीही निघून जातील. यामुळे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा देखील दूर होतो. गुलाब जल आणि ई व्हिटॅमिनच्या वापरानं चेहरा नैसर्गिकरीत्या मॉइश्चरायज होतो आणि रंगही सुधारतो.
सध्या थंडी संपून उन्हाळा सुरु होतोय, या हंगामातही गुलाबपाण्याचा उपयोग होईल तसंच हिवाळ्याच्या हंगामात, जेव्हा हवा कोरडी असते तेव्हा हे मिश्रण तुमच्या कोरड्या त्वचेवर ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. यामुळे त्वचा हायड्रेट राहते, म्हणजेच त्वचेला पुरेसा ओलावा मिळतो. यामुळे पिंपल्सचे डाग कमी होतात. रात्री चेहऱ्याला गुलाबजल - ई व्हिटॅमिननं मसाज केल्यास तुमची त्वचा चमकदार दिसेल.
advertisement
Healthy Juice : पालक, गाजर आणि बीटाचा रस प्या, आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर
1. सर्व प्रथम, गुलाब पाण्यात व्हिटॅमिन ईचे काही थेंब मिसळा.
2. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा.
3. यानंतर चेहऱ्याला हळू हळू मसाज करा.
4. 10-15 मिनिटं मसाज करा.
5. आता कोमट पाण्यानं चेहरा धुवा.
तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी असेल तर आधी पॅच टेस्ट नक्की करा.
