TRENDING:

Summer Care : चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी खास टिप्स, उन्हाळ्यातही कायम राहिल त्वचेची चमक

Last Updated:

प्रचंड घाम आणि आर्द्रता यामुळे त्वचा तेलकट होते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुमं येतात. आर्द्रतेचं प्रमाण, वातावरणातल्या बदलांमुळे त्वचेचा थर देखील खराब होतो. दमट हवामानात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही योग्य टिप्स वापरून, त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य सहजपणे जपू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्यामध्ये येणारा प्रचंड घाम आणि आर्द्रता यामुळे त्वचा तेलकट होते, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुमं येतात. आर्द्रतेचं प्रमाण, वातावरणातल्या बदलांमुळे त्वचेचा थर देखील खराब होतो. दमट हवामानात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही योग्य टिप्स वापरून, त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य सहजपणे जपता येतं.
News18
News18
advertisement

जास्त प्रमाणात सेबम स्राव झाल्यामुळे त्वचा कोरडी होते, ज्यामुळे ब्लॅकहेड्स, ऍलर्जी, लालसरपणा, खाज सुटणं आणि त्वचेची जळजळ होते. तेलकट आणि संवेदनशील त्वचा असलेल्यांना याचा जास्त अनुभव येतो.

Summer Care : घरगुती उपाय वापरा, टॅनिंगला करा छूमंतर 

दमट हवामानात त्वचेच्या समस्या

जास्त घाम येण्यामुळे पर्यावरणातल्या प्रदूषित घटक एकत्रित होऊन छिद्रांमध्ये जातात. यामुळे छिद्र बंद होऊन मुरुम तयार होतात. ओलावा, उष्णता आणि तेल यामुळे त्वचेच्या संसर्गासाठी कारणीभूत असलेल्या बॅक्टेरिया आणि यीस्टचं उत्पादन वाढतं. एक्जिमा किंवा रोसेसियाचा त्रास असेल तर जास्त आर्द्रतेमुळे त्वचेची स्थिती बिघडू शकते.

advertisement

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्स -

- आर्द्रता आणि उष्णतेमुळे त्वचेचं सर्वात जास्त नुकसान होतं. त्वचेची काळजी घेणारी उत्पादनं सौम्य पद्धतीनं वापरली तर त्वचेतील छिद्र बंद होत नाहीत.

- चांगल्या दर्जाचं हर्बल स्किन क्लींजर वापरा, ज्यामुळे त्वचेची आणखी जळजळ होणार नाही.

- दररोज टू - स्टेप क्लिंझिंग करण्याचा सल्ला त्वचातज्ज्ञ देतात. प्रथम तेल-आधारित म्हणजेच oil based क्लींझर आणि नंतर फोम-आधारित म्हणजेच foam based क्लींझर वापरावा.

advertisement

-  त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी तेल नसलेलं म्हणजेच oil free फॉर्म्युलेशन आणि मॅटिफायिंग मॉइश्चरायझर्स वापरा, ज्यामुळे जास्त तेल स्राव नियंत्रित करण्यास मदत करतील.

Summer Care : सनस्क्रीन लावून नाही पिऊन बाहेर पडा, उन्हाळ्यात त्वचेच्या रक्षणासाठी नवीन पर्याय

- Heavy मेकअप वापरणं टाळा, कारण उष्णता आणि मेकअपच्या थरांमुळे छिद्र बंद होतील.

advertisement

- दररोज न चुकता सनस्क्रीन लावा.

- शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसं पाणी प्या, ज्यामुळे त्वचा देखील निरोगी राहील.

-  घरातील वातावरण चांगलं असेल तर त्वचेची गुणवत्ता सुधारु शकते. यासाठी डिह्युमिडिफायर, एअर प्युरिफायर किंवा एअर वॉशर हे पर्याय आहेत, यामुळे घरातील हवेची गुणवत्ता सुधारेल. यामुळे हवेतील ऍलर्जी निर्माण करणारे प्रदूषक काढून टाकले जातील आणि त्वचेसाठी अनुकूल वातावरण तयार होईल.

advertisement

- चेहऱ्यावर कूलिंग मास्क किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यानंतर फेस मिस्ट/स्किन टोनरचा वापर करा.

- कोरफड जेल रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. फ्रिजमधून काढून ही जेल थेट त्वचेवर लावू शकता, ते दहा मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर धुवा. त्वचेला तेलकट न बनवता हायड्रेटेड आणि मऊ ठेवण्यासाठी रात्रीच्या वेळी जेलचा असा वापर करा.

- त्वचेला त्वरित थंडावा देण्यासाठी आइस बाउल डिप वापरा. एका भांड्यात पाणी आणि बर्फ भरा आणि नंतर काही सेकंदांसाठी चेहरा त्यात बुडवा, त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे दोनदा करा. यामुळे त्वचेमधला फरक तुम्हाला लगेच जाणवेल. त्वचा मऊ आणि टोन्ड होईल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी खास टिप्स, उन्हाळ्यातही कायम राहिल त्वचेची चमक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल